शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

२२ जुगारींवर एलसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 17:35 IST

२ लाख ९४ हजार जप्त : मध्यरात्रीची धडक मोहीम

ठळक मुद्देमालेगाव परिसरात परिसरातून ७ जणांना घेतले ताब्यातनटराज टाकी परिसरातून १५ जणांना घेतले ताब्यातपोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड, सपकाळे, हेकॉ़ एच़ जी़ ठाकरे, एस

आॅनलाईन न्यूज नेटवर्कधुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील दोन ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्यावर अचानक धाडी टाकल्या़ यात एकत्रित २ लाख ९४ हजार ८२० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून २२ जुगाºयांनाही ताब्यात घेण्यात आले आहे़ अचानक राबविलेल्या धडक मोहिमेमुळे जुगार खेळणाºयांचे धाबे दणाणले आहे़ मालेगाव रोडवर कारवाईशहरातील मालेगाव रोडवर असलेल्या आईस फॅक्टरीच्या आवारातील एका घरात बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला़ या ठिकाणी अवैधरित्या जुगाराचा अड्डा सुरु असल्याचे पोलिसांना दिसून आले़ छापा टाकत जुगाºयांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साधने व साहित्य, मोबाईल, घटनास्थळी मिळून आलेल्या दुचाकी असे एकूण २ लाख ६६ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ यावेळी शंकर गेंदालाल शिंदे (३९) रा़ विष्णू नगर, देवपूर धुळे, दिनेश अरविंद पाटील (२२) रा़ टेलिफोन कॉलनी देवपूर धुळे, सागर संजय जयस्वाल (२४) रा़ नेर ता़ धुळे, सलिम रज्जाक पिंजारी (४४) रा़ मौलवीगंज धुळे, चंद्रकांत उत्तम चौधरी (४५) रा़ पश्चिम हुडको चाळीसगाव रोड धुळे, गोकूळ केशव माळी (५२) रा़ सुभाष नगर जुने धुळे, उदेश जेरुभाई दरबार (५०) रा़ नवसारी यांना संशयावरुन अटक करण्यात आली़ धुळे शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत़ नटराज टॉकीज परिसरशहरातील नटराज टॉकीज समोरील वस्तीत एका पत्र्याच्या खोलीत चांदतारा सोशल क्रीडा मंडळाच्या नावाखाली झन्नामन्ना नावाचा जुगाराचा खेळ सुरु होता़ या ठिकाणी सुध्दा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला़ रोख रक्कम आणि जुगाराची साधने असा एकूण २८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणी मुराद हुसेन मोहमद सुलेमान (४४) मच्छीबाजार आझादनगर धुळे, रज्जाक शहा हुसेन शहा (६०) कबिरगंज धुळे, आयुब बेग रशीदबेग (५२) रा़ धुळे, जाकीर हुसेन अन्सारी (४८) हाजीनगर वडजाई रोड धुळे, समीर अब्दुल रहिम समीर अहमद अन्सारी (३६) काझी प्लॉट धुळे, मोहमद इस्माईल मोहमद कलीम (३८) रा़ मनमाड जीन धुळे, शेख सलीम शेख युसुफ (२५) रा़ गल्ली नंबर ७ पारोळा रोड धुळे, नुरबेग अश्रफ बेग (३२) काझी प्लॉट धुळे, अकलाक अहमद मोहम्मद रफिक  (३५) रा़ मौलवीगंज धुळे, अब्दुल रहिम कलीम अन्सारी (२६) रा़ इस्लामपुरा देवपूर धुळे, शकील कासीम अन्सारी (३९) रा़ गफ्फूर नगर काझी प्लॉट धुळे, अश्पाक अहमद शब्बीर अहमद (४०) रा़ आशियाना कॉलनी धुळे, शेख रशीद शेख लोटू (५५) रा़ काझी प्लॉट धुळे, जावीद शेख फकीर मोहमद (३४)  रा़ तिरंगा चौक धुळे, शन्स तब्रेज मोहमद शाबान (५५) रा़ मौलवीगंज धुळे यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास आझादनगर पोलीस करीत आहे़