शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

एलबीटी दरवाढीचा प्रस्ताव नाकारला

By admin | Updated: November 20, 2014 13:34 IST

महापालिकेतर्फे एलबीटी कर दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु एलबीटी संदर्भात ठोस निर्णय न झाल्याने हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे.

 धुळे : महापालिकेतर्फे एलबीटी कर दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु एलबीटी संदर्भात ठोस निर्णय न झाल्याने हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. त्यामुळे उत्पन्न कसे वाढवावे, असा प्रश्न आता प्रशासनापुढे उभा राहिला आहे. गेल्या ६ जुलै २0१३ पासून जकात बंद होऊन एलबीटी (स्थानिक संस्था कर) कर लागू केला आहे. गेल्याच महिन्यात पारगमन शुल्क वसुलीही बंद झालीआहे. त्यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. एलबीटीच्या उत्पन्नवाढीसाठी काही वस्तूंच्या दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडून मागविण्यात आला होता. दरवाढीचा मनपा आयुक्तांनी प्रस्ताव पाठविला होता. परंतु एलबीटी करासंदर्भात ठोस असा निर्णय झाला नसल्याने दरवाढीचा प्रस्तावही नाकारण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक कर वसुलीसाठी सात कर्मचार्‍यांची एलबीटी विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच व्यापार्‍यांनी सादर केलेले रिटर्न तपासण्यासाठी पॅनल तयार करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ठोस पर्याय नाहीएलबीटी कर व जकातीला व्यापार्‍यांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. त्यामुळे व्यापार्‍यांची भूमिका लक्षात घेता, एलबीटी कर कायम ठेवायचा की, अन्य पर्याय द्यायचे यासंदर्भात अद्यापही शासनाची निश्‍चित भूमिका नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर एलबीटीच्या वाढीसाठी प्रयत्न करतानाही अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. र८ेु'>च्/र८ेु'>एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ दरम्यान, १६ कोटी ४६ लाख ७२ हजारांचा एलबीटी कर व्यापार्‍यांकडून वसूल झाला आहे, तर कर बुडविणार्‍या २३ व्यावसायिकांकडून ९ लाखांवर दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. एलबीटी कर लागू होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला असला, तरी महापालिकेला अपेक्षित असे उत्पन्न मिळविता आले नाही. त्यात शासनाच्या संदिग्ध भूमिकेमुळे मनपाची आर्थिक स्थिती आणखीच बिकट झाली आहे. आता २0 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. याला आयुक्त पठाणही उपस्थित राहणार असून, याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष लागले आहे.