पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात ॲड. कुंदन पवार यांनी फिर्याद दाखल केली. देवपुरातील विघ्नहर्ता कॉलनी प्लॉट नंबर ८२ मध्ये ॲड. पवार यांचे निवासस्थान आहे. ते आपल्या परिवारासोबत बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा, कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान केले. घरातील कपाटात ठेवलेली ३१ हजाराची रोख रक्कम आणि २० हजार रुपये किंमतीचे चांदीची देव धुण्याची ताटली, पाण्याचा तांब्या, ग्लास असा एकूण ५१ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्याने पोबारा केला. चोरीची ही घटना २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ३ सप्टेंबर रोजी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली आहे. ॲड. पवार हे घरी आल्यानंतर आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार, घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वकीलाचे घर फोडले, हजारोंचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST