शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात स्वच्छता महोत्सवास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 11:57 IST

स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचा उपक्रम

ठळक मुद्दे२४ जूनपासून महोत्सवास सुरूवातविविध उपक्रम राबविणार २ आॅक्टोबर रोजी समारोप

आॅनलाइन लोकमतधुळे : स्वच्छ भारत मिशन (ग्रापंचायत) या कार्यक्रमाला २ आॅक्टोबर २०१९ रोजी पाच वर्षे पूर्ण होत असल्याने, या कार्यक्रमाची उपलब्धी साजरी करणे आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या स्वच्छता कार्यकर्त्यांची दखल घेण्यासाठी जिल्ह्यात स्वच्छता महोत्सव २०१९चे आयोजन करण्यात आले आहे. २४ जून पासून या महोत्सवास सुरूवात झाली असून, त्याचा समारोप २ आॅक्टोबरला होणार आहे.स्वच्छता महोत्सव साजरा करतांना समुदायस्तरावर स्वच्छतेविषयी कामासाठी लोकसंघटन घडवून आणणे, समाजाच्या विभिन्न घटकातील स्वच्छता कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्वच्छता दर्पण ग्रामीणमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन ग्रामसेवक, तालुका समन्वयक, गटविकास अधिकारी यांच्यासाठी १ सप्टेंबर रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येईल. हा दिवस स्वच्छ प्रेरक दिन म्हणून साजरा करण्यात येईल.विविध उपक्रम राबविणारया कार्यक्रमांर्तग स्वच्छतेच्या विषयावर प्रदर्शन भरविणे, स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची उपलब्धी साजरी करणे, स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करणे, त्यांना पुरस्कार देणे, स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करून स्वच्छ सुंदर शौचालय दिन साजरा करणे, उत्कृष्ट काम केलेल्या सरपंच, आणि लाभार्थी यांचा सत्कार करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या महोत्सवात जिल्ह्याप्रमाणेच राज्यस्तरावरदेखील सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ यांनी केले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे