शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला खरेदीसाठी लातूरचे व्यापारी शेतीबांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:52 IST

ऐन दुष्काळात व भाव नसताना न्याहळोद परिसरातील शेतक-यांना मोठा दिलासा

ठळक मुद्देऐन दुष्काळात भाजीपाला, दुधाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिललातूरच्या व्यापा-यांकडून खरेदीमुळे वाहतूक खर्चासह मजुरीचा खर्चही वाचलान्याहळोद परिसरातील शेतक-यांना मोठा दिलासा 

लोकमत आॅनलाईन न्याहळोद, ता.धुळे : ऐन दुष्काळात भाजीपाला व दुधास भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. नुकतेच गावात लातूर येथील व्यापारी कोथिंबीर व  भाजीपाला खरेदीसाठी आले आहेत. ते स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त भाव देत असल्याने शेतक-यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.  यावर्षी पाऊस कमी असल्याने जास्त कालावधीचे पीक न घेता लवकर तयार होणा-या भाजीपाला पिकांकडे शेतकरी वळले आहेत. यामुळे शेतात भरपूर उत्पादन आल्याने बाजारात भाज्यांचे दर कमालीचे घसरले आहेत. प्रसंगी शेतमाल शेतातून काढून बाजारात नेण्याचा खर्च देखील निघत नाही. अशा स्थितीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र नेमक्या याच कठीण प्रसंगात लातूर येथील व्यापारी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गावात दाखल झाले आहेत. त्यांनी नुकतीच एक गाडी भरून कोथिंबीर शेतक-यांकडून खरेदी केली. शेतातून भाजीपाला काढणा-या मजुरांचे पैसे देखील हेच व्यापारी देत असल्याने शेतक-यांच्या वाहतूक खर्चासह मजुरीच्या खर्चातही बचत झाली आहे. एरवी बाजारात भाजीपाला नेऊन त्यासाठीचा खर्च निघेल किंवा नाही, याची खात्री नसते. परंतु या व्यवहारात शेतात पीक उभे असतांनाच किती पैसे हातात मिळतील, याची खात्री असल्याने शेतकरी सुखावला आहे. स्थानिक बाजारपेठेत विक्रीत स्पर्धा नसल्याने भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात होता. पण परजिल्ह्याातून आलेल्या व्यापा-यांमुळे भाजीपाला उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी एकजूट दाखवून जास्तीत जास्त भावाने शेतमाल विक्री केला तरच दोन पैसे हातात येतील. दुष्काळी परिस्थितीत लातूरचे व्यापारी आपल्या बांधावर पोहचले, ह्या संधीचे शेतक-यांनी सोने करावे, असे शेतकरी यशवंतराव माधवराव पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती