शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

लोणच्यासाठी कैऱ्यांची मोठी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:22 IST

महिलांची लगबग : विविध मसाले घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी; २५० ते ३५० शेकडा दराने विकी

कुसुंबा : साधारणपणे जून महिन्यात पहिला पाऊस पडला की ग्रामीण भागात घरोघरी लोणच्याचा सुवास दरवळयाला लागतो. अद्याप अपेक्षित पाऊस पडला नसला तरी घराघरांत गृहिणींची मात्र लोणचे तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. लोणच्यासाठी बाजारात कैºया दाखल होत असून २५० ते ३५० रुपये शेकडा दराने विक्री होत आहे. तर लोणचे साठविण्यासाठी चिनी मातीच्या बरण्यांनाही मागणी वाढली आहे.लोणच्यासाठी लागणारी कैरी घेण्यासाठी बाजारपेठेत सध्या महिलांची गर्दी दिसू लागली आहे. मान्सूनपूर्व पावसाने परिसरात रिमझिम हजेरी लावल्याने लोणच्यासाठी लागणाºया कैºया घेण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे. यंदा कैऱ्यांची आवक कमी प्रमाणात आहे. साधारणपणे २५० ते ३५० रुपये शेकडा या भावाने कैºयांची विक्र होत आहे. लोणच्यासाठी लागणारे मसाल्याचे पदार्थही यंदा महागले आहेत. अतिशय दळदार आणि बाहेरून काळपट हिरवी ; परंतु आतून पांढरी शुभ्र, अशा कैरीला बाजारात मोठी मागणी आहे. ग्रामीण भागासह गुजरात राज्यातील सौराष्टतील लोणच्याच्या कैरीला मोठी मागणी आहे. बाजारातून कैरी विकत घेऊन त्या घरी स्वच्छ पाण्यात टाकली जातात. मग ती कैरी दुसºया दिवशी सकाळी धुऊन व पुसुन फोडली जाते. चमचमीत मसाला टाकून लोणचे तयार केले जाते. त्याचप्रमाणे हे लोणचे टाकण्यासाठी लागणाºया चिनी मातीच्या बरणीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली. कैरी लोणच्यासोबतच लिंबु, आवळा, हिरवी मिरची आदींचेहे लोणचे टाकण्यात महिलांची लगबग सुरू आहे. पुर्वी मातीपासून तयार केलेल्या खा-यांमध्ये लोणचे भरले जायचे. मात्र, आता हळूहळू तो हद्दपार झाला आहे. स्थानिक व्यापाºयांनी हैदराबाद व गुजरात येथुन बरण्या मागविल्या आहेत. हे लोणचे दीर्घकाळ टिकते. ते बनविण्याचीही पूवार्पार एक पद्धत आहे. त्या पद्धतीताच अवलंब करून गृहिणी लोणचे बनविण्याचे काम करीत असतात.

टॅग्स :Dhuleधुळे