शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

११ गावांचा जमीन वापर नकाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:19 IST

महापालिका : नगररचना विभागाकडून कार्यवाही सुरू, दरमंजुरीसाठी विषय येणार स्थायीत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने हद्दवाढीतील गावांमध्ये गट जोडणीचे काम सुरू केले होते़ त्यानंतर जमिन वापराचा संपूर्ण नकाशा तयार करण्यासाठी सुमारे २ कोटी रूपयांच्या खर्चाची निविदा काढण्यात आली होती़ आता प्राप्त निविदांचा विषय दर मंजूरीसाठी स्थायी समितीच्या सभेत ठेवला जाणार आहे़ शहर हद्दवाढीत ११ गावांचा समावेश झाला आहे़ या गावांमधील संपूर्ण जमिन सध्या कोणत्या वापरात आहे, याचे ‘रेकॉर्ड’ तयार करण्यासाठी जमिन वापर नकाशा अर्थात डीपी प्लॅन तयार केला जाणार आहे़ त्यासाठी नगररचना विभागाकडून लवकरच निविदा काढली जाणार असून खासगी संस्थेस ते काम दिले जाणार आहे़ धुळे महापालिका क्षेत्रासाठी सुधारीत शहर विकास आराखडा लागू झाला आहे़ परंतु शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या ११ गावांचा त्यात समावेश नाही़ त्यामुळे महापालिकेच्या शहर विकास आराखड्यात भविष्यात या गावांमधील जमिन वापराचा समावेश करावा लागणार आहे़ त्यादृष्टीने त्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाणार आहे़ शासकीय वापर, निवासी, शेती, उद्याने, औद्योगिक वापराचा समावेश करून जमिन वापर नकाशे तयार करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली़ त्यानंतर मनपाकडून निविदाही काढण्यात आली़ त्यानुसार ४ निविदा प्राप्त  झाल्याची माहिती सुत्रांनी दिली़ आता प्राप्त निविदा दर मंजूरीसाठी स्थायी समितीच्या सभेत ठेवल्या जाणार असून त्या मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात होणार आहे़ जमिन वापर नकाशा तयार केल्यानंतर गावांचा विकास योग्य रितीने होणे सोयीचे होईल़ गावांसाठीच्या निधीचा प्रस्ताव प्रलंबित़़रस्ता डांबरीकरण- ८३़४४ कि.मी.- ९२ कोटी, ९६ लाख ४७ हजार ६१०, रस्ता नूतनीकरण- ४१़७० कि.मी.- १२ कोटी ४० लाख ७ हजार ८२, सिमेंट रस्ते- ९़१ कि.मी.- १० कोटी ६० लाख ५२ हजार ६७३, गटारी- २८१़९६ कि.मी.- ९६ कोटी १० लाख ५१ हजार ४६०, संरक्षण भिंती- १८़९५ कि.मी.- १२४ कोटी ६३ लाख ३३ हजार ८५७, सार्वजनिक शौचालय- २३ युनिट- ३ कोटी ८४ लाख ७८ हजार ५००, सांडपाणी व्यवस्थापन- ७ कोटी ५४ लाख ९० हजार ७२१, एकूण- ३४९ कोटी ३८ लाख ४३ हजार २८९ रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर असून तो प्रलंबित आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे