शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुसुंब्यानजीक क्रेन-दुचाकीची समोरासमार धडक, दोघांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:55 IST

गोताणेनजीकची घटना : दुसºया दिवशी ग्रामस्थांचा रास्तारोको 

ठळक मुद्देदुचाकीस्वारांपैकी दोघांचा मृत्यू, एक गंभीरगुरूवारी सकाळी ग्रामस्थांचा रास्तारोकोसंबंधित कंपनीकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील गोताणे येथून कुसुंबा येथे येणाºया दुचाकी व कुसुंब्याकडून गोताणेकडे जाणारी क्रेन यांची समोरासमोर धडक होऊन जखमी झालेल्या तिघांपैकी दोघांचा रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. तिसºया जखमीची प्रकृतीही गंभीर असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेसंदर्भात गुरूवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोेको करण्यात आला. त्यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. संदीप काशिनाथ पाटील (३०), रावसाहेब आबाजी पाटील (२८) दोघे रा.गोताणे अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. तर विजय पाटील (२५) याने या अपघातात पाय गमावला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी संध्याकाळी संदीप पाटील, रावसाहेब पाटील व विजय पाटील हे दुचाकीने कुसुंबा येथील बाजाराला येत होते. राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असून तेथील वळण रस्त्यावर (बायपास) दुचाकी व क्रेनची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच गोताणे व उडाणे येथील कडू दासनोर, चुडामण पाटील, हिंमत पाटील, दगडू पाटील, बालू मिस्तरी, सरपंच विठोबा बागुल, भिमा सूर्यवंशी आदींनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना सरकारी व खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर लगेच उपचार सुरू करण्यात आले. मात्र शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या संदीप काशिनाथ पाटील याचा मृत्यू झाला. तर तासाभराने खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या रावसाहेब पाटील याचा मृत्यू ओढवला. तत्पूर्वी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी भेट देऊन माहिती घेऊन तत्परतेने उपचाराची सूचना केली. विजय पाटील याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.रास्ता रोको, मदत जाहीर चौपदरीकरणाचे काम जीएचव्ही कंपनीकडे असून या कंपनीचीच क्रेन असल्याने गोताणे व उडाणे ग्रामस्थांनी राष्टÑीय महामार्गावर गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रास्तारोको करून मयताच्या कुटुंबाना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. रास्तारोकोमुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर आंदोलन थांबवून आंदोलक व कंपनीच्या अधिकाºयांत चर्चा झाली. त्यानुसार मयताच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख व जखमीच्या कुटुंबास अडीच लाख रुपये देण्याचे अधिकाºयांनी जाहीर केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

 

टॅग्स :Dhuleधुळे