शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भगवामय वातावरणात धुळ्यात क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 14:55 IST

घोषणाबाजींनी दुमदुमला परिसर : जिल्ह्यातील सकल मराठा व सर्वसमावेशक समाजबांधवांची उपस्थिती

ठळक मुद्देदुपारी १२ वाजून ९ मिनीटांनी मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी १ वाजता हा मोर्चा जुन्या प्रशासकीय संकुलावर आला. तेथे सभेचे रूपांतर मोर्चात झाले. राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, माजी आमदार प्रा. शरद पाटील व प्रदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चात जिल्हाभरातून ३० ते ३५ हजार मराठा व सर्वसमावेशक समाजबांधवांची उपस्थिती होती. शांततेत पार पडला मोर्चा

लोकतम न्यूज नेटवर्क धुळे :  कोरेगाव भिमा प्रकरणानंतर धुळ्यात ३ रोजी एका विशिष्ट समूहाने मोर्चा काढला. त्यावेळी महापुरुषांचा अवमान होईल, अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील व्यापाºयांच्या दुकानांवर दगडफेक  झाली.  ज्यांचा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही; त्यांना काही समाजकंटकांनी मारहाण केली. या घटनेचा निषेधार्थ शुक्रवारी धुळे जिल्ह्यातील सकल मराठा व सर्वसमावेशक समाजाच्या वतीने क्रांती मोर्चा पार पडला. मोर्चात सहभागी मोर्चेकºयांनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत शहरातील परिसर दुमदुमून सोडला. शहरातील जुन्या आग्रारोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा खंडेराव बाजार, पाचकंदील चौक, कराचीवाला खुंट, मनपा, झाशीचा राणीचा पुतळामार्गे जुने प्रशासकीय संकुलापर्यंत आला. तेथे मोर्चाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना संकल मराठा समाजातील वैष्णवी सूर्यवंशी, सायली काळे, ढीना ढबळे, साक्षी मोरे, वैशाली शिरसाठ, विद्या देसले या तरुणींच्या  शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनात ३ रोजी निघालेल्या मोर्चात एका विशिष्ट समूहाने महापुरुष व अन्य महनीय नेत्यांच्या विरोधात अश्लिल घोषणाबाजी दिल्या. या अपकृत्याची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड. श्यामकांत पाटील, उद्योजक निरंजन भतवाल, गुलशन उदासी, साहेबराव देसाई, अनिल खंडेलवाल व समाजबांधव उपस्थित होते. मोर्चानिमित्त शहरातील चौकाचौकात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टिका  ३ रोजी झालेला अन्याय यापुढे सहन करणार नाही, असे मनोज मोरे यांनी त्यांच्या मनोगतात सांगत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. बुधवारी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी गांभीर्याने संबंधित अपप्रवृत्तींवर कारवाई केली असती, तर हा उद्रेक आज झाला नसता, असे म्हटले.