दराने येथील २१ वर्षीय तरुण पशुवैद्यकीय डॉक्टर प्रेमसिंग गिरासे हा ६ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशी शिंदखेडा येथील शोरूममधून नवी मोटारसायकल घेऊन दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरी जात होता. चिमठाणेजवळील सबस्टेशनजवळ श्याम युवराज मोरे, राकेश रोहिदास मोरे व संदीप फुलचंद पवार यांनी मयत याची मोटरसायकल चोरीच्या उद्देशाने अडवले . त्याच्यावर धारदार शास्रने वार करून त्याची मोटारसायकल व मोबाईल घेऊन पसार झाले होते. पोलिसांनी तपास चक्र फिरवून तिन्ही आरोपीना वेगवेगळ्या ठिकाणांहून त्याच रात्रीच ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात उभे केले असता त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. आरोपींनी मृतास मारलेला चाकू व त्याची मोटारसायकल आरोपी शाम मोरे याने त्याच्या माळीच येथील सासऱ्याच्या घरात लपून ठेवला होता .तो पोलिसांनी हस्तगत केला. मोटारसायकल माळीच गावाला लागून तलावाच्या काठालगत असलेल्या खड्ड्यात होती ती पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भाबड यांनी दिली.
आरोपींकडून चाकू, मोटारसायकल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST