शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून दोघांवर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 22:14 IST

सात जणांविरुध्द गुन्हा : जखमींवर धुळ्यात उपचार

धुळे : मागील भांडणाची कुरापत काढून दोघांवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना चाळीसगाव येथील भडगाव रोडवरील एकावर हॉटेलजवळ ३ जानेवारी रोजी सकाळी घडली़ जखमींवर धुळ्यातील जवाहर मेडीकल कॉलेजमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आल्याने, घटनेची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात केल्यानंतर गुन्हा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला़चाळीसगाव येथील घाटरोड भागात राहणारा सिद्धांत आनंदा कोळी (२३) या तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, मागील भांडणाची कुरापत काढत त्याला संशयित आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली.एवढ्यावरच न थांबता चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केल्याने पोटाला दुखापत झाली आहे़ तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वसंत राजेंद्र बच्छाव यांनाही मारहाण करुन त्यांच्या डोक्यावर चाकूने वार करण्यात आला़ वाद विकोपाला जात असल्यामुळे याच ठिकाणी असलेले दुकानदार उमेश नथ्थू कळथे, गणेश भोसले यांनी मध्यस्थी करीत भांडण सोडविले़ घटनेनंतर सिद्धांत कोळी, व वसंत बच्छाव या दोघांना जवाहर मेडीकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची प्राथमिक नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात ४ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घेण्यात आली.याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला पवन रमेश चव्हाण, रोहन रमेश चव्हाण यांच्यासह अन्य पाचजण (सर्व रा. चाळीसगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, हाणामारीची ही घटना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्यामुळे हा गुन्ह्याची प्राथमिक नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात केल्यानंतर हा गुन्हा चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे