शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

गरम रक्तात भिनतेय देशी कट्ट्याची रग ‘खेळ खल्लास’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:07 IST

धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह

ठळक मुद्देशहरातील  दोन नंबरचे धंदे करणारे, व्याजाने पैसे देण्याचा धंदा करणाºया तथाकथित डॉनला पोलिसांकडून दिली जाणारी वागणूक पाहून तरुणही त्यांच्या वर्चस्वामुळे हुरळून जातात. त्यांच्यामध्ये मग अशा गुंडांची क्रेझ वाढते. ते मग त्यांच्या नादी लागतात आणि जाणता अजाणता अशा घटनेत गुरफटून जातात. सध्या शहरात रोज उठून असे नवीन गुंड तयार होत आहे. यांना नमस्कार करण्यात धन्यता न मानता उलट पोलिसांनी वेळीच कारवाई करुन  पुन्हा असे नवीन गुंड तयार होणार नाही, याची काळजी घेतली तरच  धुळे शहरासह जिल्ह्यात अशा घटना घडणार नाही आणि पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित

राजेंद्र शर्मा, धुळे‘बच के तू रहना रे, बच के तू रहना, नही दुजा मौका मिलेगा संभलना, बस खल्लास’ हे हिंदी चित्रपटाचे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. ते गाणे ऐकल्यावर अंगावर शहारे येत. असे घडू शकते का, असा प्रश्न तेव्हा पडायचा, पण आता धुळे शहरात अशा घटना घडू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात सोमवारी बनावट (कट्टा) पिस्तुलच्या  मदतीने चार तरुणांनी गरीब मोलमजुरी करणाºया आईच्या एकुलत्या एक मुलाचा  खून केला, तो खून का केला, याचे खरे कारण अजून पुढे आलेले नसले तरी तो  खून ज्या सहजतेने करण्यात आला, त्यावरुन  धुळ्यात त्या गाण्यातील शद्ब तंतोतत खरे ठरतांना दिसत आहेत. धुळेकरांसाठी तसेही हे वर्ष एका मागून एक घडणाºया खुनाच्या आणि हाणामारीच्या घटनांमुळे कायमचे स्मरणात राहणार आहे. जुलै महिन्यात कुख्यात गुंड गुड्डयाचा क्रुरपणे भर चौकात खून करण्यात आला होता. त्या घटनेने तर धुळयाचे नाव हे सोशल मिडियाद्वारे जगभर कुप्रसिद्ध झाले. त्यानंतर शहरात गुटख्याची पुडी विकत घेण्यावरुन एकाचा खुन करण्यात आला. ऐन दिवाळीत फटाके फोडण्याच्या वादावरुन युवकाचा तलवारीने वार करुन खून, त्यापाठोपाठच देवपुरात हत्ती डोहाजवळ कट मारल्याच्या क्षुल्लक वादावरुन एका युवकाचा तलवारीने वार करुन खून करण्यात आल्याची घटना घडली. पिंपळनेरजवळील खेड्यात माजी उपसरपंचाला जमिनीच्या वादातून जिवंत जाळल्याची घटना घडली, या घटनांमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरुन काहीही घडू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली की काय, असे वाटते.धुळे तालुक्यातील कुंडाणे येथे घडलेल्या घटनेत तरुणांनी बनावटी देशी कट्टयाचा वापर करुन दीपक वाघ या तरुणाचा खून केला. या घटनेतील तरुणांनी तर गोळी झाडल्यानंतर त्या  तरुणाला मोटारसायकलवर बसवून त्याच्यावर कोणीतरी अज्ञात लोकांनी हल्ला केल्याचा बनाव करुन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापर्यंतची डेअरींग केली. सुदैवाने रुगणालयातील डॉक्टरांच्या लक्षात आले की,  दीपक वाघचा खून झाला आहे. त्यांनी ताबडतोब यासंदर्भात पोलिसांना माहिती दिल्याने ते दोन संशयित त्याठिकाणीच पोलिसांनी ताब्यात  घेतले. त्यामुळे पुढील तपासाचे धागेदोरे सापडले. घटनेतील सर्वच संशयित तरुण आहेत. ज्या वयात शिक्षण घेऊन नोकरी किंवा उद्योगधंदा टाकून आपले भविष्य घडविण्याचा प्रयत्न या तरुणांनी करायला हवा. त्या वयात त्यांनी खून करुन आपले संपूर्ण जीवनच अंधकारमय करुन घेतले आहे.खून करण्यासाठी या तरुणांकडे विदेशी बनावटीचा देशी कट्टा आला कुठून, हा प्रश्नच आहे. अशापद्धतीने जर सहजतेने तरुणांना बेकायदेशीरपणे पिस्तुल उपलब्ध होत असतील तर ही बाब धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खूपच भितीदायक आहे. कारण मग अशा घटना या वाढणारच आहे. कारण मजाक मस्करी तसेच किरकोळ वादातून होणाºया हाणामारीतसुद्धा याचा वापर होऊ शकतो. तलवारी वापरणे ही तर धुळ्याच्या दृष्टीने खूपच नॉर्मल गोष्ट झाली आहे. तलवार चालविल्याची घटना घडली तर ती आता धुळेकरांसाठी खूप गंभीर गोष्ट राहिलेली नाही. तसेच आता बेकायदेशीरपणे देशी पिस्तुल बाळगणे, चालविणे हा ट्रेड सुद्धा हळूहळू प्रचलित होतांना दिसत आहे.जिल्ह्याच्या सीमेवर सातपुड्याच्या गावांमध्ये हा देशी कट्टा विक्रीचा धंदा सर्रासपणे चालतो. आता हा धंदा हळूहळू मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे. चांदवडजवळ सापडलेल्या शस्त्रसाठा हा सुद्धा मध्यप्रदेशातून धुळे मार्गेच जात होता, हे उघडकीस आले आहे. म्हणजेच विदेशी बनावटीचे देशी कट्टे आणि काडतुस बनविण्याचा सीमेवर सुरु असलेला उद्योग हा आता मोठे रुप घेतो आहे, हे याचे चिन्ह आहे. जिल्हा पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून हा धंदाच समुळ नष्ट करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पाऊले उचलली पाहीजे, अन्यथा धुळे शहरासह जिल्ह्याचा क्राईम चार्ट हा वाढतच जाणार आहे.