देवपुरातील शिवप्रताप काॅलनीत राहणारे श्यामकांत सीताराम शिंदे हे या अपघातात जखमी झाले असून त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील बाळापूर शिवारातून एमएच १८ एजे ६३१८ क्रमांकाच्या कारमधून शिंदे आणि त्यांचा परिवार हा जात होता. त्याचवेळेस एमएच १८ एन ७१३६ क्रमांकाची ॲपेरिक्षा ही भरधाव वेगाने येत असताना कारला धडकली. हा अपघात बाळापूर शिवारातील एका हॉटेलजवळ घडला. यात रिक्षा चालकाने कारला समोरुन धडक दिल्याने या अपघातात श्यामकांत शिंदे, त्यांची पत्नी छायाबाई श्यामकांत शिंदे, जयवंत भास्करराव शिंदे, आशालता प्रदीप शिंदे या चौघांना दुखापत झाली. कारचे देखील नुकसान झाले. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
कालीपिली रिक्षाची कारला धडक, ४ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:39 IST