शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या पाच रुपयांत जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 12:21 IST

रमाई पोळी-भाजी केंद्र : एका अभिनव उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील मोराणे येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात रमाई पोळी-भाजी केंद्र सुरु झाले़ अवघ्या ५ रुपयात त्याचा लाभ मिळत असल्याने या अभिनव उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे़ या उपक्रमाचे अनुकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात केले जात आहे, हे विशेष़समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (ता़ धुळे) येथे ग्रामीण आणि आदिवासी भागासह मालेगाव, साक्री, शिरपूर यासारख्या ठिकाणाहून विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि अनेकजणं ये-जा करत असतात़ जवळपास ८ तास ते महाविद्यालयात असतात़ यातील बºयेच विद्यार्थी तर पहाटे ५ वाजेच्या सुमारास घर सोडतात़ त्यामुळे त्यांना घरुन जेवणाचा डबा आणणे शक्य होत नाही़ त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बाहेर कुठे नास्ता अथवा जेवण करणे आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडत नाही़ विद्यार्थी उपाशीपोटी शिक्षण घेवू शकत नाही़ ही मुलभूत गरज लक्षात घेता संस्थेचे सचिव प्रा़ विलास वाघ यांनी एक अभिनव संकल्पना मांडली आणि रमाई पोळी-भाजी केंद्र या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ जालिंदर अडसुळे यांनी अस्तित्वात आणले़ प्राचार्य डॉ़ जालिंदर अडसुळे आणि प्रा़ रचना अडसुळे या दाम्पत्याच्या पुढाकाराने साजिद शेख यांच्या पुढाकाराने अहोरात्र प्रयत्न करुन १ जुलै २०१७ रोजी रमाई पोळी-भाजी केंद्राची सुरुवात झाली़ त्या दिवसांपासून आजतागायत हे केंद्र सुरु आहे़ अनेक जण त्याचा आनंदाने लाभ घेऊन आपली भूक भागवित आहेत़ महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे़ रमाई पोळी-भाजी केंद्र हा स्वप्नपूर्ती प्रकल्प अस्तित्वात आणण्यासाठी तसेच तो कायमस्वरुपी चालविण्यासाठी एक योजना आखण्यात आली़ केवळ ५ रुपये नाममात्र दराने पोळी-भाजी देण्याचे ठरविण्यात आले़ त्यासाठी प्रथम गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांची यादी करण्यात आली़ विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी एक सर्व्हेक्षणाचा अर्ज तयार करण्यात आला़ विद्यार्थ्यांची खरी माहिती भरुन घेण्यासाठी प्रत्येक प्राध्यापकाने साधारणपणे चार विद्यार्थ्यांच्या घरी भेट देवून सर्वेक्षण अर्ज भरुन घेण्यात आले़ प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्याला सदरहू केंद्राच्या लाभाची यादी देण्यात आली़ अशा ४० विद्यार्थ्यांसाठी रमाई पोळी-भाजी केंद्र सुरु करण्यात आले़ आजच्या स्थितीत या उपक्रमाचा लाभ ७० विद्यार्थी घेत आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे