शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ४८ तासात चोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 21:10 IST

स्थानिक गुन्हे शाखा : हिरे मेडीकलच्या कॅन्टीनमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये चोरी करणाºया चोरट्याला अवघ्या ४८ तासात जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले़ चोरीला गेलेल्या मुद्देमालासह चोरट्याला अटक करण्यात आली़ धुळ्यातील चक्करबर्डी येथील बायपास रस्त्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास चोरी करण्यात आली होती़ चोरट्याने कॅन्टीनमध्ये घुसून सोन्याचे मंगळसुत्र, दोन मोबाईल, चॉकलेट आणि सौंदर्य प्रसाधने चोरुन नेली होती़ या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल रफिक पठाण, पोलीस कर्मचारी प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, कुणाल पानपाटील, अशोक पाटील, उमेश पाटील, विलास पाटील, मयूर पाटील, तुषार पारधी, रवी राठोड यांनी तपासाला सुरुवात केली़ सीसीटीव्ही फुटेजची मदत घेऊन पोलिसांच्या पथकाने त्या चोरट्याचा माग काढला़ आरोपीबद्दल माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून जबीर शहा (रा़ वडजाई रोड, धुळे) याला ताब्यात घेतले़ त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ त्याच्याकडून १३ हजार ५०० आणि १ हजार ५०० रुपये किंमतीचे दोन मोबाईल, ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, रोख रक्कम आणि सौंदर्य प्रसाधने असा सर्व मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे़ त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी