शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:52 IST

जिल्ह्यातील स्थिती : शिरपूरचा अपवाद, विक्रीसाठी आणलेल्या भुसार शेतमालाची तेवढी खरेदी 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : केंद्र सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी बाजार कायदा आणत असून त्यामुळे माथाडी कामगार  कायदा रद्द होणार असल्याच्या निषेधार्थ राज्य माथाडी कामगार हमाल संघर्ष समिती व चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेडने पुकारलेल्या बंदच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील धुळे, दोंडाईचा, साक्री येथे मंगळवारी व्यवहार ठप्प झाले. शिरपूर येथे समितीत शेतकºयांनी शेतमाल विक्रीस आणल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी व्यवहार सुरू ठेवण्यात आले.दोंडाईचात ६० लाखाची उलाढाल ठप्प महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार हमाल संघर्ष समिती व चेंबर आॅफ असोशिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेडने पुकारलेल्या बंदच्या आवाहना नुसार दोंडाईचा येथील हमाल मापाडी कामगार युनियनने बंद पाळला आहे. त्यामुळे बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. विविध शेतीमालाची सुमारे ६० लाख रुपये किमतीची ३ हजार ५७० क्विंटल आवक आज ठप्प झाल्याची माहिती दोंडाईचा बाजार समिती सूत्रांनी दिली.सरकार कृषि माल थेट ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी बाजार कायदा आणत आहे. बाजार समितीसाठी हा कायदा महत्त्वाचा असला तरी या कायद्यामुळे माथाडी कायदा रद्द होण्याची भिती आहे. माथाडी कायदा रद्द होण्याच्या हालचालीच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समीत्या आज बंद आहेत. या पार्श्वभूमीवर दोंडाईचा येथील हमाल मापाडी कामगार यूनियनने बाजार समिती कामकाज बंदबाबत संघटनेचे अध्यक्ष पंडित पाटील, उपाध्यक्ष धुड़कु तिरमलि, सचिव रतन भील, खजिनदार भिका तिरमलि यांनी सोमवारी निवेदन दिले होते.सुमारे ५०० हमाल मापाडी बंदमध्ये सहभागी आहेत. त्या मुळे  दोंडाईचा बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.  सद्यस्थितीत मका, मिरची, गहु जास्त आवक असते. मका, मिरची, गहु, शेंगा, मुग, हरभरा, ज्वारी, दादर, बाजरी आदि शेतीमालाची सुमारे ६० लाखांची सरासरी आवक ३ हजार ५७० क्विंटल आवक आज ठप्प झाली.  मालात उत्पन्नात प्रचंड घट आली असताना बाजार समितीत मंदी होती. त्यातच बंदमुळे बाजार समोतीतीत शुकशुकाट जाणवलाशिरपूरला बंदच्या आवाहनानंतरही शेतमालाची खरेदी कायद्याविरोधात बाजार समित्या मंगळवारी बंद करण्याचे आवाहन करून सुध्दा काही शेतकºयांनी भुसारमाल विक्रीसाठी आणल्यामुळे त्यांची गैरसोय होवू नये म्हणून त्याचे मोजमाप करण्यात आले़ त्यानिमित्त सुमारे १२ लाखाची उलाढाल झाली़ सद्यस्थितीत माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी असलेला कायदा रद्द करण्याच्या हालचाली सुरू असून त्याच्या निषेधार्थ बंदचे आवाहन केले होते़ त्यानुसार, येथील मार्केट कमिटी प्रशासनाने सुध्दा बंदच्या आदल्याच दिवशी मार्केट कमिटी मंगळवारी बंदबाबत सूचित केले होते. मात्र काही शेतकºयांना बंद संदर्भात माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी भुसार माल विक्रीसाठी आणला़ २५-३० वाहनांमधून मका, ज्वारी, बाजरी, शेंगा आदी भुसार माल आला होता़ शेतकºयांनी मार्केट प्रशासनाकडे माल खरेदी करण्याची मागणी केल्यामुळे प्रशासनाने देखील शेतकºयांची गैरसोय होवू नये म्हणून सदरचा माल खरेदी करण्यात आला़ साक्री बाजार समिती बंद: २ कोटींची उलाढाल ठप्प राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज एक दिवसाचा बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर आज साक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. या बाजार समितीत सध्या फक्त भुसार मालाची आवक सुरू आहे तर कांद्याची आवक पिंपळनेर बाजार समितीमध्ये होत असते. बाजार समितीचा एक दिवसाच्या संपामुळे जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. बाजार समितीच्या संपामुळे शेतकºयांनी कोणताही माल विक्रीस आणलेला नव्हता

टॅग्स :Dhuleधुळे