शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरणी पीडित मुलीस न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 15:50 IST

मागणी : सर्व समाज समावेशक समितीतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन

ठळक मुद्दे याप्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, हे प्रकरण जलद न्यायालयात चालविण्यात यावे, या प्रकरणाची बाल हक्क आयोगामार्फत चौकशी करून सुनावणी घ्यावी. पीडित मुलीला व तिच्या परिवाराला शासकीय खर्चाने पोलीस संरक्षण मिळावे, सह आरोपींना तत्काळ अटक करावी, भविष्यात असे कृ त्य टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमियो करणाºयांच्या विरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. कळमसरे (ता. अमळनेर) येथे मुलीवर अत्याचार प्रकरणी नराधमास कठोर शिक्षा करावी.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  दोंडाईचा येथील पाच वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सीआयडी चौकशी करून संबंधित पीडित मुलीस न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हा सर्व समाज समावेशतर्फे गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा सर्व समाज समावेशकतर्फे गुरुवारी महा मूकमोर्चा काढण्यात आला होता. या मूकमोर्चाची सांगता जिजामाता शाळा येथे झाली. त्यानंतर तरुणींच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की दोंडाईचा येथे ८ फेब्रुवारीला नूतन विद्यालयाच्या परिसरात पाच वर्षाच्या बालिकेवर नराधमाने अत्याचा केला. ही घटना पीडित मुलीच्या शारीरिक तपासणीनंतर उजेडात आली. यासंदर्भात पीडित मुलीच्या आई, वडीलांनी संस्थाचालक, मुख्याध्यापक व इतर कर्मचाºयांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. माहिती देण्यास टाळाटाळ केली. पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणी काही लोकांची भूमिका ही संशायास्पद दिसून येत आहे. त्यामुळेच या घटनेचा गुन्हा दाखल होण्यास उशीर झाला. त्यामुळे संशयित आरोपीला पळून जाण्यासाठी  वेळ  मिळाला. आता याप्रकरणी मुख्य  आरोपीस अटक करण्यात आली असून तपास अधिकारी व यंत्रणा दबावाखाली काम करीत आहे, हे स्पष्ट होते. यावेळी साक्षी मोरे, रोशनी चौधरी, सेजल बैसाणे, सिद्धी करनकाळ, हिमाणी वाघ, भाविका चौधरी, हर्षदा चौधरी, सपना चौधरी, रूपाली चौधरी, इशा बेडसे, साक्षी चौधरी, किरण पाटील, प्रणाली चौधरी, सुरेखा नांद्रे आदी उपस्थित होत्या. पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरणाला आज एक महिना पूर्ण होत आहे. आतापर्यंत मुख्य आरोपीला अटक झाली असून सहआरोपीला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. परिरामी, पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. 

१५ मार्चनंतर तीव्र आंदोलन 

दरम्यान, निवेदनातील मागण्या त्वरित निकाली न निघाल्यास १५ मार्चनंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.