दापूर,जेबापूर,रोहन व सामोडे या परिसरात सद्यस्थितीत पाण्याची खरोखरच टंचाई जाणवत असल्याने जामखेडी मध्यम प्रकल्पातून साक्री तालुक्यातील गावांसाठी प्रकल्पातील आरक्षित केलेले पाणी १० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात यावे असे पत्र जिल्हाधिकारी धुळे यांना आमदार गावित यांनी दिले होते व याला मंजुरी मिळाल्याने त्याअनुषंगाने पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचे आदेश मिळाले त्यानुसार दि.
१२ रोजी जामखेडी मध्यम प्रकल्पातून आमदार मंजुळा तुळशीराम गावित यांच्या हस्ते टंचाईग्रस्त भागातील गावांना सोडण्यात आले. यावेळी पिंपळनेर अपर तहसीलदार विनायक थविल, जि.प सदस्य दीपक बारुडे, पाटबंधारे विभागाच्या सहायक अभियंत्या कविता कुवर, शाखा अभियंता एम.बी.पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रावसाहेब घरटे, संभाजी अहिरराव, सामोडे तलाठी चव्हाण व अजित बागुल आदी उपस्थितीत होते. तसेच मालनगाव आणि लाटीपाडा या प्रकल्पातून पांझरा नदीकाठच्या ३५ ते ४० गावांसाठी पाणी सोडण्यात यावे अशीही विनंती जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार मंजुळा तुळशीराम गावित यांनी यावेळी सांगितले.