धुळे : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत पहिल्या व दुस:या टप्प्यातील रखडलली कामे आचारसंहितेचा अडसर दूर होताच मार्गी लागणार आहेत. जिल्ह्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे 4 जानेवारीपासून आचारसंहिता सुरू असून 3 रोजी मतदानानंतर ती हटणार आहे. महिनाभराच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील सुमारे 400 कामांना प्रारंभ होऊ शकलेला नाही. यातील काही कामांच्या निविदा तसेच काहींचे कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) निघू शकले नव्हते.
‘जलयुक्त’ची रखडलेली कामे मार्गी लागणार
By admin | Updated: February 1, 2017 00:12 IST