शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणसरींचा झाला दमदार वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:40 IST

धुळे जिल्हा : दिवसभर सूर्याचे दर्शन झालेले नाही, पावसामुळे जनजीवन विस्कळीत, बाजारपेठेत नेहमीपेक्षा गर्दी कमी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :शहरासह जिल्ह्यात गुरूवारी दमदार श्रावणसरींचा वर्षाव झाला.दिवसभर सुरू राहिलेल्या रिपरिप पावसामुळे शहरासह जिल्हावासिय ओलेचिंब झाले. बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर असा पाऊस झाल्याने नागरिक समाधानी झाले आहेत.शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. रात्रीही पाऊस झाला. तर गुरूवारची पहाट पावसानेच उगवली. सकाळपासून थोड्या-थोड्या अंतराने पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी कार्यालयात जाण्याच्या वेळेस पावसाने हजेरी लावल्याने कार्यालयात जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. सुमारे अर्धातास झालेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढतांना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. तर पादचाºयांना या पाण्यातून मार्गक्रमण करण्यावाचून पर्याय राहिला नव्हता. बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांनीही दुकानांचा आसरा घेत पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.रस्त्याचे तीनतेरादरम्यान दोन महिन्यांपूर्वीच येथील छोट्यापुलावर डांबरीकरण करण्यात आलेले होते. मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे या पुलावरील डांबर उखडलेले आहे. त्यामुळे पुलावर जागोजागी खड्डे पडले असून, यातून मार्ग काढतांनाही चालकांना कसरत करावी लागत होती.धुळे तालुक्यातील नेर गावातही दमदार पाऊस झालेला आहे. तिसगाव ढंढाणे परिसरातही पाऊस होता.तर शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात १२ आॅगस्ट रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळ पासुन संततधार पाऊस सुरू होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. येथील नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती ती या पावसामुळे काहीशी पूर्ण झाली.दरम्यान दोंडाईचा शहरातही गुरूवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवला. नेहमीपेक्षा बाजारात गर्दी कमी होती.साक्री, पिंपळनेर या परिसरातही कधी रिपरिप तर कधी दमदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.श्रावण महिन्यात होत असलेल्या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. पोळ्यापूर्वीच होत असलेल्या पावसामुळे शेतकरीवर्ग समाधानी आहे.