शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरात भर उन्हाळ्यात पाण्याची नासाडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:43 IST

रोज हजारो लीटर पाणी वाया : अनारोग्य फैलण्याचाही धोका; महापालिकेची यंत्रणा मात्र सुस्त

ठळक मुद्देदुस-या सांगे ब्रह्मज्ञान..मनपाच्या कारभाराची स्थिती पाणी मिळत नसताना ते वाया जात असल्याने नागरिकांमध्ये रोषगळत्या शोधून त्यांची दुरुस्ती करणार, उपायुक्तांची माहिती  

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराला पाणीपुरवठा करणा-या  पाईपलाईनला जागोजागी लागलेल्या गळत्यांमुळे रोजी हजारो लीटर पाणी अक्षरश: वाया जात असून भर उन्हाळ्यात सुद्धा ही परिस्थिती कायम आहे. एकीकडे शहरातील बहुतांश भागांना नियोजन नसल्याने सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. तर दुसरीकडे हजारो लीटर स्वच्छ पाणी वाहून वाया जात आहे. भरीस भर म्हणजे या गळत्यांमुळे  नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान...डेंग्यूचे डास निर्माण होतील म्हणून मनपा नागरिकांना आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे उपसण्यास सांगते, भांडे घासून स्वच्छ करण्यास सांगते. मात्र शहरात अनेक ठिकाणी गळतीमुळे वाया जाणाºया पाण्यात डासांची निर्मिती होत असल्याने अनारोग्य फैलण्याची दाट शक्यता आहे. या मुळे महापालिकेची स्थिती ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ अशी झाली आहे. साक्रीरोडवर पं.नेहरू उद्यानाजवळ, जवाहर नगर, सिंहस्थ नगर, हनुमान टेकडी जलशुद्धीकरण, संतोषीमाता मंदिर चौक, दत्तमंदिर चौक, पारोळा रोड, वडजाई रोड, जमनागिरी रस्ता अशा विविध भागांत गळत्यांद्वारे पाणी वाया जात असून मनपा यंत्रणेस त्याचे काही सोयरसुतक उरलेले दिसत नाही. या मुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. साक्रीरोडवरील मोठ्या गळतीकडेही अद्याप दुर्लक्ष शहरातील साक्रीरोडवर पंडित जवाहरलाल उद्यानालगत लागलेल्या गळतीतून रोज हजारो लीटर स्वच्छ पाणी नजीकच्या गटारातून वाहत वाया जात आहे.या गळतीबाबतही स्थानिक नागरिकांनी मनपाला कळविले, तक्रारी केल्या. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या गळतीची दुरुस्ती झालेली नाही. अद्याप या गळतीतून पाणी वाहून वाया जात आहे. भर उन्हाळ्यातही पाण्याचे मोल न समजणा-या मनपाच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. शहरातील साक्रीरोडवर असलेल्या जवाहर नगरात गळतीमुळे गटारातून वाहणाºया स्वच्छ पाण्यात मोठ्या संख्येने डेंग्यूच्या डासाच्या अळ्या दिसून आल्या. मोठ्या वस्तीतून ही गटार वाहते. परंतु मनपा आरोग्य विभागास इकडे पाहण्यास वेळ नाही. नागरिकांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत यापूर्वीच मनपाला कळविल्याचे सांगितले.मनपा गळत्या शोधून दुरूस्ती करणार मार्चअखेर वसुलीचे काम  संपल्याने कर्मचाºयांची पथके तयार करण्यात येणार आहेत. या पथकातील कर्मचारी  शहराच्या विविध भागात गळत्या शोधून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त रवींद्र जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  

 

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका