शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

९० उपवरांनी दिला परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:20 IST

दोंडाईचा : कोळी समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा, परराज्यातूनही उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोळी समाजातर्फे रविवारी दादासाहेब रावल स्टेडियमवर वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील ९० उपवर तरुण-तरुणींनी परिचय करुन दिला. मेळाव्यास राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश राज्यांमधूनही उपवर उपस्थित होते.अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज शाखा धुळे व नंदुरबार जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय  सातवा वर -वधु  पालक  परिचय मेळावा घेण्यात आला.अध्यक्षस्थानी    माजी आमदार तथा अ.भा. कोळी समाज प्रदेशाध्यक्ष कांतिजी कोळी होते. मेळाव्याचे उद्घाटन अ.भा. कोळी समाज राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार सत्यनारायण पवार यांच्याहस्ते झाले.व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रदीप नवसारे, मेळावा समिती अध्यक्ष मनोज निकम, पं.स. सदस्य शानाभाऊ सोनवणे, नगरसेवक नरेंद्र कोळी,  सत्यनारायण पवार, पोपटराव अंतुर्लीकर, रमेश निकम, सुरेश कुवर, प्रवीण देवरे, जयेंद्र सूर्यवंशी, सुशिल नवसारे, शिवदास चित्ते, अरविंद बागुल, प्रकाश सोनवणे, शरद तवर, दिलीप सोनवणे, भानुदास कोळी, संजय ईशी, सुनील कच्छवा, संतोष जाधव आदी उपस्थित होते.याप्रसंगी सत्यनारायण पवार म्हणाले, परिचय मेळाव्यामुळे वधु- वर शोधण्यासाठी लागणारा खर्च वाचून यामुळे काही लग्नही जुळतील. समाजाचे संघटन महत्वाचे  आहे, विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी होण्यासाठी संघटन महत्वाचे आहे. जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी  आम्ही  प्रयत्नशील आहोत म्हणून कोळी समाजाच्या झेंड्याखाली  एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.   मनोज निकम म्हणाले,  मेळाव्यासाठी महाराष्टÑासह परराज्यातून  ६०० उपवर -वधुंची नोंदणी झाली आहे. मेळाव्यात ९० उपवर तरुण तरुणींनी परिचय करुन दिला. त्यात बहुसंख्य पदवीधर आहेत. मेळाव्यात प्रथम पुनम विश्वास निकम या युवतीने परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कोळी समाज जिल्हाध्यक्ष प्रदीप नवसारे, सूत्रसंचलन रमेश निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज निकम,  जयेश सूर्यवंशी,  प्रदीप नवसारे, मनोज सोनवणे, कैलास ईशी, रविंद्र ईशी, सुरेश कुवर, प्रकाश सोनवणे, दिनेश चव्हाण, राजेंद्र ठाकरे, संजय ईशी    आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :Dhuleधुळे