धुळे : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान राजगृहावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या तोडफोडीच्या घटनेचा राज्यभर निषेध होत असताना त्याचे पडसाद धुळ्यातही उमटले़ विविध पक्ष संघटनांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत समाजकंटकांना त्वरीत पकडण्याची मागणी केली़वंचित बहुजन आघाडीच्या धुळे जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली़ यावेळी आघाडीचे भैय्या पारेराव, राज चव्हाण, नामदेव येळवे, प्रा़ मोतीलाल सोनवणे, विजय पाटील, योगेश जगताप, राजदीप आगळे, अॅड़ चक्षुपाल बोरसे, शंकर खरात, नितीन वाघ, भाऊसाहेब शिरसाठ, जितेंद्र साळवे, दीपक पाटील, नवीन देवरे, विशाल केदार, अॅड़ संतोष केदार, निलेश अहिरे, सागर मोहिते, गौतम बोरसे, प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते़रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटानेही जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून माथेफिरूंना पकडण्याची मागणी केली़ निवेदानावर जिल्हाध्यक्ष विशाल पगारे, सुगत मोरे, सुभाष पवार, राहूल पवार, इंद्रजित करडक, अजय पगारे, समाधान भामरे, वृंदावन पवार, मयुर बेडसे, सनी पगारे, योगेश खैरनार, रोहित म्हसदे आदींच्या सह्या आहेत़
राजगृहावरील हल्ल्याचे धुळ्यात तीव्र पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 22:47 IST