शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 13:09 IST

दिलासा: धुळे जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या प्रयत्नांना यश

ठळक मुद्देशालार्थ प्रणाली बंदमुळे वेतनाची आली होती अडचणशिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांची शिक्षण मंत्र्यांशी चर्चाजानेवारीचे वेतन आॅफलाईन करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे जानेवारीचे वेतन आॅफलाईन पद्धतीने वितरीत करण्याचे आदेश महाराष्टÑ शासनाच्या उपसचिव चारूशिला चौधरी यांनी दिले १ फेब्रुवारी रोजी पारीत केले आहे. त्यामुळे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेलाच व्हावे,  यासाठी  शासनाने शालार्थ वेतन प्रणाली सुरु केली. मात्र या प्रणालीनुसार दर महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचे पगार कधीच होत नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे.  त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांमध्ये अगोदरच नाराजी  त्यातच  शालार्थ वेतन प्रणाली गेल्या २० दिवसांपासून बंद असल्याने, शिक्षकांची वेतन देयके तयार होऊ शकली नव्हती. त्यामुळे शिक्षकांचे जानेवारी २०१८ या महिन्याचे वेतन रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.दरम्यान याबाबत शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मंत्रालयात शिक्षणमंत्री, सचिव यांच्याशी , आयुक्त यांच्याशी चर्चा केली. शालार्थ वेतन प्रणालीची सेवा तात्काळ सुरु करण्यात यावी अथवा या शालार्थ वेतन प्रणाली मध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यास ती दुरुस्त होईपर्यंत शिक्षकांची, कर्मचाºयांचे जानेवारी महिन्याचे वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्विकारण्यात यावी असा आग्रह धरला.  वित्त विभागाची मंजुरी घेऊन शासनाच्या उपसचिव चारूशिला चौधरी यांनी १ फेब्रुवारी २०१८  रोजी  एक पत्र काढून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे जानेवारी २०१८चे   वेतन देयके आॅफलाईन  पद्धतीने वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. धुळे जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेची  जानेवारी १८ची  वेतन देयके तात्काळ वेतन पथक विभागात सादर करावीत असे आवाहन शिक्षक परिषद धुळेचे  मार्गदर्शक मदनलाल मिश्रा ,  अध्यक्ष भरतसिंह भदोरिया, कार्यवाह महेश मुळे, यांनी कळविले आहे. शिक्षकांना दिलासाशासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ११०३ शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.