शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सरकारकडे भिक्षेची झोळी पसरण्याऐवजी आपल्या बोली भाषांना सन्मान द्यायला हवा: प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे

By देवेंद्र पाठक | Updated: March 3, 2024 17:59 IST

चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

देवेंद्र पाठक, धुळे : आपला देश खऱ्या अर्थाने खेड्यातला आणि शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे त्यांचीच भाषा ही खरी अभिजात भाषा असून, या हिशोबाने अहिराणी ही अभिजात भाषा ठरते. सरकारकडे भिक्षेची झोळी पसरण्याऐवजी आपणच आपल्या बोली भाषांना सन्मान देणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमात ही भाषा यावी यासाठी प्रयत्न करावेत आणि असे झाल्यास संमेलनाचे हे यश ठरेल, असे प्रतिपादन १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा साहित्यिक प्रा. डाॅ. वासुदेव मुलाटे यांनी अहिराणी संमेलनात व्यक्त केले.

अहिराणी साहित्य परिषद धुळे आणि विद्यावर्धिनी सभा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यावर्धिनी महाविद्यालयात स्व. अण्णासाहेब सदाशिव माळी साहित्य नगरीत चौथे अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा. डाॅ. मुलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे चेअरमन अक्षय छाजेड होते, तर स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील होते. व्यासपीठावर अहिराणी साहित्य परिषदेचे धुळ्याचे अध्यक्ष प्रा. भगवान पाटील, कोल्हापूरचे प्रतापराव पाटील, माजी न्यायाधीश जे. टी. देसले, किशोर ढमाले, केशव बहाळकर, बाबा हातेकर, डॉ. दरबारसिंग गिरासे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अनिल दामोदर, प्राचार्य संजीव गिरासे, प्राचार्य डॉ. मधुकर वानखेडे, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, प्रा. डॉ. शशिकला पवार, शकुंतला बोरसे, कलावती माळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रकाश महाले यांच्या लोभी मामांस्ना परलोभी पोरी आणि वनमाला पाटील यांच्या पांझरा नदीन्या थडीकाठन्या कविता या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

प्रा. डॉ. मुलाटे म्हणाले, मराठीचा अभ्यासक असूनही अहिराणी बोलता येत नाही ही खंत आहे. भाषा हे मनातले माध्यम असावे. समज, काही गैरसमज असू शकतात, पण आपल्या आईची भाषा हीच खरी भाषा असते. पण, आम्ही तिला आज विसरत आहोत. अनेक भाषांची जननी म्हणून संस्कृतकडे पाहण्यात येते, मुळात हे चुकीचे आहे. भाषा कोणतीही असू देत, शेवटी माणसं महत्त्वाची आहेत. पण, आज माणसांकडे दुर्लक्ष केले जात आहे. संवाद हेच प्रभावी माध्यम आहे. पाठ्यपुस्तक ही त्या त्या भाषेतून यायला हवी. अभ्यासक्रमात अहिराणी भाषेचा समावेश असावा आणि यासाठी सर्वांचे सामूहिक प्रयत्न होणे अपेक्षित आहे, असे झाल्यास संमेलानाचे हे यश ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Dhuleधुळे