शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 21:36 IST

जिल्हा परिषदेत तक्रार निवारण सभा : मुख्याध्यापक, विषय शिक्षकांच्या सप्टेंबरमध्ये पदोन्नतीचे आश्वासन

धुळे : प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देवून पदवीधर शिक्षकांचे रिक्त पदे  भरावीत, पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधुन  केंद्रप्रमुखांची पदे भरावे यासह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते तत्काळ सोडविण्यात यावे अशी मागणी जिल्हा समन्वय समितीने तक्रार निवारण सभेत केली. दरम्यान मुख्याध्यापक, विषय शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकाºयांना सप्टेंबरपर्यंत पदोन्नती दिली जाईल असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी दिले. प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी  जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची तक्रार निवारण सभा  उपमुख्य र्कायकारी अधिकारी ए.जे. तडवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार उपस्थित होते.जिल्हा प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यात प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देऊन पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, पदोन्नतीने मुख्याध्यापकांची पदे भरण्यात यावीत, पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांची पदे भरावीत, उर्दू प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देऊन पदोन्नती मुख्याध्यापकाची पदे भरावीत,वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव विनाविलंब मंजूर करून वेतन श्रेणी लावावी,  प्राथमिक शाळांचे वीज बिल ग्रामपंचायतमार्फत भरण्यात यावे, शालेय पोषण आहाराचा तांदुळ व इतर धान्य मागणीप्रमाणे त्या-त्या महिन्यात पाच तारखेपर्यंत मिळावे अशी मागणी करण्यात आली.  त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता  फंडात लवकरात लवकर जमा करावा, वैद्यकीय बिले विनाविलंब मंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. दरम्यान मुख्याध्यापक, विषय शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकाºयांना सप्टेंबरमध्ये पदोन्नती दिली जाईल,  विस्थापित शिक्षकांच्या बदल्या  केल्या जातील असे आश्वासन दिले.प्रास्ताविक सरचिटणीस किशोर पाटील यांनी  तर आभार प्रविण भदाणे मानले.सभेस समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे, सरचिटणीस किशोर पाटील सदस्य रविंद्र खैरनार, गमण पाटील, भगवंत बोरसे, नविनचंद्र भदाणे, शरद सूर्यवंशी, उमराव बोरसे, राजेंद्र नांद्रे, हारुण अन्सारी, अनिल तोरवणे, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, चंद्रकांत सत्तेसा, प्रविण भदाणे, नानासाहेब बोरस, सुरेंद्र पिंपळे, भुपेश वाघ, योगेश धात्रक, ज्ञानेश्वर बाविस्कर,दत्तात्रय पाटील, रवींद्र सोळंके, नगराम जाधव,रुपेश जैन, रविंद्र पाटील, रियाज अन्सारी, अकिल अन्सारी, सुधीर पाटील, धिरज परदेशी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे