शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हिरे महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेची चौकशी करा : औरंगाबाद उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST

महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्याने तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला संधी दिल्याने अकोला येथील अभिजीत पल्हाडे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात रीट याचिका ...

महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्याने तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला संधी दिल्याने अकोला येथील अभिजीत पल्हाडे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल देताना प्रवेश प्रक्रिया संशयास्पद असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले तसेच चार आठवड्यांत चौकशीला सुरुवात करून आठ आठवड्यांपर्यंत चौकशी पुर्ण करा, असे आदेश सीईटी विभागाच्या आयुक्तांना दिले असल्याची माहिती याचिकाकर्त्याचे वकील ॲड. संदीप चोपडे यांनी दिली. मात्र, याचिकाकर्ते अभिजीत पल्हाडे यांनी प्रवेश घ्यायला उशीर केला, यामुळे त्यांना दिलासा द्यायला न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ॲड. चोपडे यांनी सांगितले.

प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला दिला प्रवेश -

ॲड. संदीप चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरे महाविद्यालयात ऑगस्ट २०२० मध्ये एम.डी.च्या एका जागेच्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले होते. आलेल्या अर्जांमध्ये गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकावर मानसी शहा, द्वितीय क्रमांकावर अमोल येवलेकर तर तृतीय क्रमांकावर याचिकाकर्ते अभिजीत पल्हाडे यांचे नाव होते. त्यानंतर मानसी शहा यांना प्रवेश मिळाल्याचे दाखवण्यात आले. याचिकाकर्ते पल्हाडे यांनी मानसी शहा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हिरे महाविद्यालयात अर्जच दाखल केला नसल्याचे सांगितले तसेच अमोल येवलेकर यांनीही मुंबई येथे प्रवेश घेतल्याचे सांगितले. सुरुवातीला मानसी शहा यांचा प्रवेश झाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर मात्र प्रतीक्षा यादीत ३१ व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला प्रवेश देण्यात आला. याबाबत पल्हाडे यांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता तुम्ही स्वतः अर्ज सादर न करता सहकाऱ्यामार्फत सादर केल्याने प्रवेश नाकारल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी पल्हाडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नव्हते, असे ॲड. चोपडे यांनी सांगितले. संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद वाटल्याने अभिजीत पल्हाडे यांनी रीट याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.