ग्राम विकास अधिकारी नितीन वारुडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वारुड गावात असलेल्या भीषण पाणी टंचाईमुळे माजी मंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री यांच्याकडून वारुड गावास निधी प्राप्त करून दिला. निधी मिळूनही पाणी पुरवठा योजना योग्य पद्धतीने राबवली नाही. या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यात ज़े दोषी आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या कामाचे एस्टीमेटनुसार काम झालेले नाही. पाणी पुरवठा योजनेतील पाणी फिल्टर नाही. तसेच १५ ते २० दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. निवेदन देताना मनोज शिंपी, प्रीतम सोनवणे, अनिल बोरसे, मनोज खैरनार, संदीप खैरनार, किशोर खैरनार, आकाश दोरिक, दीपक पवार, मनोज खैरनार, समाधान पाटील, गोपाल दोरिक उपस्थित होते.