शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यातील शिरधाने येथे लसीकरणामुळे झालेल्या बालमृत्यूची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:23 IST

ग्रामस्थांचे सीईओंना निवेदन : प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

आॅनलाइन लोकमतधुळे : तालुक्यातील मौजे शिरधाने येथे एक महिन्याच्या बालिकेचा सदोष बी.सी.जी. लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषी आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, नेर आरोग्य केंद्रातर्गत असलेल्या शिरधाने आरोग्य उपकेंद्रातर्गत २ सप्टेंबर १९ रोजी नियमित लसीकरण झाले. शीतल ठाकरे यांच्या एक महिन्याच्या स्त्री जातीच्या बालकाला बी. सी. जी. लस देण्यात आली. त्यानंतर बालक लगेच मुलूल झाले. त्याने दूध पिणे बंद केले. याबाबत आरोग्यसेविकांना माहिती दिली. मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे बालक ३ सप्टेबर रोजी दगावले. याचा जाब आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. लसीकरणापूर्वी बालकाची प्रकृती साधारण होती असे निवेदनात म्हटले आहे. आरोग्य विभागातील कर्मचाºयांनी सेवा देण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात कुटुंब कल्याण विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर डॉ. पटेल या चौकशीसाठी आल्या. त्यांनी आरोग्य कर्मचाºयांचीच बाजू घेतली.सदोष लसीकरणामुळे बालकाचा मृत्यू झाला हे मानायला आरोग्य विभाग तयार नाही. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन त्रयस्थ समितीमार्फत पुन्हा चौकशी करून दोषी आरोग्य कर्मचाºयांवर कारवाई करावी . निवेदनावर गणेश सोनवणे, दाजभाऊ पाटील, सतीष पाटील, शांतीलाल पाटील, सुरेश सोनवणे, प्रकाश सोनवणे आदींच्या स्वाक्षºया आहेत.दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हा सर्वेक्षण अधिकारी शिरधाने येथे जाऊन आले. त्यांनी अहवाल सादर केला आहे. बालिकेचा मृत्यू सदोष लसीकरणामुळे झालेला नाही असे जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे