शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी भाड्यात वाढ; पण सुविधांची बोंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 21:26 IST

अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजर : गाडीचे स्वरूप पूर्वीसारखेच राहू द्या; प्रवाशांची मागणी

ठळक मुद्दे रेल्वे प्रशासनाने सदर गाडीचे ४ आॅगस्ट म्हणजे शुक्रवारपासून अमरावती -सूरत एक्सप्रेस १९०२५ व १९०२६ असे नाव व गाडी क्रमांक बदलून भाड्यात वाढ केली आहे. सदर गाडीचा वेळात व सुविधांमध्ये दुसरी कोणतीही सुधारणा व दर्जा न सुधारता केलेली वाढ अन्यायकारक असल्याचे महत्वाचे म्हणजे भाड़े वाढ केल्यापासून या गाडीने प्रवास करणाºयांची संख्या कमालीची रोडावली आहे. रेल्वे प्रशासनाने पूर्वीचाच म्हणजे फास्ट पसेंजरचा दर्जा या गाड़ीला देऊन तिचे भाडेही पूर्वीप्रमाणेच आकारावे, अशी मागणी सर्वसामान्य ग्राहक व प्रवासी संघटनेने केली लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांना भाडे कमी करण्याबाबत साकडे घालावे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : रेल्वेप्रशासनाने सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकसाठी सुरु असलेल्या  अमरावती  फास्ट पसेंजर या गाडीचे रूपांतर आता मेल एक्सप्रेसमध्ये केले असून प्रवासी भाड्यात  सुमारे ६६ टक्के वाढ केली आहे. मात्र कोणत्याही जादा सुविधा न पुरविता म्हणजे सुविधांच्या नावाने बोंब असताना भाडेवाढ झाल्याने  सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने अमरावती -सूरत फास्ट पॅसेंजरचे रूपांतर शुक्रवार ४ आॅगस्ट पासून अमरावती -सूरत मेल असे केले असून प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. सूरत -अमरावती भाड़े पूर्वी ११५ रुपए होते ते आता १९५ रुपये झाले आहे. येथून सुरत येथे जाण्यासाठी पूर्वी ४५ रुपये भाड़े होते ते आता ७५ रुपये झाले आहे . अमरावतीला पूर्वी ७० रुपये भाडे लागत असे, आता मात्र त्यासाठी १२० रुपए मोजावे लागणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई  पाटील यांचा पुढाकाराने २००७ साली  अमरावती -सूरत फास्ट पैसेंजर सुरु झाली होती. अमरावती, अकोला, जळगाव, धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील  सर्वसामान्य शेतमजूर व आर्थिक दुर्बल घटकातील प्रवाशांची  सूरत, शेगाव व जळगाव जाण्यासाठी सोय व्हावी म्हणून गाडी क्रमांक ५९०२५  व गाडी क्रमांक ५९०२६  सुरू केली होती.     येथील रेल्वे स्थानकावरून सूरतकडे जाण्यासाठी संध्याकाळी ४.२३ वाजता सोमवार, शुक्रवार व शनिवार तर भुसावळकडे जाण्यासाठी  गुरूवार, शुक्रवार व शनिवार असे प्रत्येकी तीन-तीन दिवस सदर गाडीची सुविधा आहे. कामानिमित्त हजारो मजूर या गाडीने प्रवासी करतात.  त्यांना ही गाडी अल्प खर्चिक असल्याने वरदान ठरली होती.  गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी यापूर्वी भाविक अल्प भाड्याने जात असत. फारशा सुविधा नसल्या तरी कमी भाड्यामुळे या गाडीला प्रवासी मोठ्या संख्येने मिळत असत.