शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार वाढल्याने नक्षलवादासारख्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 17:09 IST

अभयकुमार सिंग : विद्यावर्धिनी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

ठळक मुद्देमाणसाचे वर्तन न कळणात्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ़ बी़बी़पाटील यांनी, नक्षलवादी हे आपल्यातलेच दुरावलेले घटक असून त्यांना मुळ प्रवाहात आणले जायला हवे असे मत व्यक्त केले़ दिलीप पाटील यांनी, माणसाचे वर्तन हेच आज माणसासमोरचे न कळणारे कोडे झाले आहे़ ‘माझा संबंध नाही’ ही वृत्ती बदलली तर समस्याही सुटतील, असे विचार डॉ़ पाटील यांनी मांडल.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देशातील विकासाचा पैसा भ्रष्टाचारात जात असल्याने नक्षलवाद, दहशतवादासारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत़ विकासाबरोबर आपण विनाशही ओढवून घेत असल्याने भ्रष्टाचार रोखण्याची प्रबळ इच्छाशक्ती अत्यंत आवश्यक आहे, असे मत प्रा़डॉ़ अभयकुमार सिंग (अयोध्या, उत्तरप्रदेश) यांनी व्यक्त केले़विद्यावर्धिनी महाविद्यालयात ‘एकविसाव्या शतकातील नक्षलवाद चळवळ : कारणे व उपाययोजना’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद््घाटन रविवारी झाले़ त्यावेळी प्रा़डॉ़ अभयकुमार सिंग बोलत होते़ या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ़ बी़बी़पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ़ दिलीप पाटील, नाशिक येथील भोसला मिलीटरी कॉलेजचे डॉ़ पी़ए़घोष, तहाराबाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ मनोज साळी,  पितांबर महाले, अक्षय छाजेड, युवराज करनकाळ, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, प्राचार्य डॉ़ ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़ यावेळी बोलतांना प्रा़डॉ़ सिंग म्हणाले की, नक्षलवाद हा सरकारच्या काही चुकांचा परिणाम असून देशासमोरील समस्यांमध्ये वाढ झाली आहे़ नक्षलवाद, दहशतवाद या प्रमुख समस्या आहेत़ पूर्वी केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित असलेला नक्षलवाद अलिकडे शहरी भागातही पसरत असून चीन, पाकिस्तान सारख्या देशांचे त्यांना पाठिंबा मिळत आहे़ विकासाचा पैसा भ्रष्टाचारात जात असल्याने या समस्यांना बळ मिळत आहे़ विकासाचा विचार होत असला तरी विकासाबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी होत असून ती विनाशाकडे नेणारी आहे़ त्यामुळे सर्व समस्यांचे मुळ असलेला भ्रष्टाचार रोखण्याची प्रबळ इच्छाशक्ती हवी, असे मत प्रा़डॉ़ सिंग यांनी व्यक्त केले़ दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़.