शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा ४८ गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:19 IST

वादळी पाऊस, गारपीट : ४४२.५८ हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान

धुळे : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा चारही तालुक्यांना फटका बसला असून ४४२.५८ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे कमी-अधिक फरकाने नुकसान झाल्याचे सुधारित प्राथमिक अंदाजाच्या अहवालात म्हटले आहे. त्यात प्रामुख्याने केळी, पपई, मका, लिंबू, आंबा, बाजरी व भाजीपाला पिकांचा समावेश आहे. साक्री तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.गेल्या महिन्यात १५, १६ व १७ असे सलग तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यात जिल्ह्यातील गोराणे, कंचनपूर, अजनाड, विखरण, हिसाळे, वाघाडी, भोरखेडा, तरडी, तोंदे, नटवाडे, आलण, थाळनेर, बोराडी, मुखेड, बलकुव, तºहाड कसबे, साक्री आदी शिवारात वादळी पावसाने धुमाकूळ घातला होता. सोबत गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला होता. त्यानंतर आता सुधारित प्राथमिक नजर अंदाज प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४८ गावांमधील सुमारे ८५० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद केले असून एकूण ४४२.५८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात ३३ टक्क्यापेक्षा जास्त बाधित क्षेत्र ३६४.०१ हेक्टर तर त्यापेक्षा कमी बाधित क्षेत्र ७८.५७ हेक्टर आहे. सुधारित प्राथमिक अंदाजानुसार साक्री तालुक्यात सर्वाधिक म्हजे ३०४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे तर सर्वात कमी धुळे तालुक्यात ५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या समितीकडून नुकसानाचा अहवाल तयार करून तो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविला जाईल. त्यानंतर कृषी विभागाकडून झालेल्या पिकांच्या नुकसानाचे मूल्यांकन केले जाईल.जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समितीकडून अंतिम अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठविला जाणार आहे असे सूत्राकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे