सदर पदग्रहण समारंभ रोटरी आय हॉस्पिटल येथे झाला. अध्यक्षस्थानी सुरेश जैन होते. रोटरीयन पंकज नाईक यांच्या हस्ते पदग्रहण समारंभ झाला. इनरव्हील क्लब मार्फत किशोर कापुरे यांना कुबडी दिली. दिव्यांगांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोटरी अपंग प्रशिक्षण केंद्राचे अनावरण करण्यात आले. प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सुरेश जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेश जैन म्हणाले की, दिव्यांगांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. यावेळी असिस्टंट गव्हर्नर रवींद्र पाटील, सचिव ॲड. नितीन अयाचित, नामदेव थोरात, डॉ. राजेंद्र गुजराथी, प्रवीण महाजन, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा फरिदा साक्रीवाला, सचिव जयश्री पाटील, मुनिरा विरदेलवाला, मनिषा गुजराथी, मरियम कादियानी, व आ सीसी अपंग राऊंड टाऊनचे चेअरमन हुसेन विरदेलवाला, अध्यक्ष नरेंद्र गिरासे, उपाध्यक्ष भरत राजपूत, सचिव ईश्वर राजपूत, भटेसिंग राजपूत, हितेंद्र बागल, पी.डी. बागल, आनंदसिंग गिरासे, अमरदास कुकरेजा, कैलास तिरमले, दिलीप महाजन, प्रमोद सूर्यवंशी, महावीर जैन, अरविंद राजपूत, सुरेंद्र राजपूत
आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हुसेन विरदेलवाला व ॲड. स्नेहा अयाचित यांनी केले.