शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ३ हजार बालकांची मुख आरोग्य तपासणी, सील ॲण्ड स्माईल उपक्रम 

By भुषण चिंचोरे | Updated: March 27, 2023 19:29 IST

धुळे जिल्ह्यात वर्षभरात ३ हजार बालकांची मुख आरोग्य तपासणी करण्यात आली. 

धुळे : येथील जिल्हा रुग्णालयाच्या मुख आराेग्य विभागातर्फे एप्रिल २०२२ ते २० मार्च २०२३ या कालावधीत ३ हजार ५५३ बालकांची मुख आरोग्य तपासणी करून त्यांच्या दाढांमध्ये सिलेंट भरण्यात आले. कर्करोग निर्मूलनासाठी शासनाकडून सील ॲण्ड स्माईल उपक्रम राबवला जात आहे. अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील बालकांची जिल्हा रुग्णालयाच्या पथकातर्फे मुख आरोग्य तपासणी केली जाते. 

दातांमध्ये कीड व इतर त्रास असलेल्या बालकांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित केले जाते. याठिकाणी बालकांवर आवश्यकतेनुसार उपचार केले जातात. दातांमध्ये कीड असेल, तर ती संपूर्णपणे काढली जाते व त्याठिकाणी सिलेंट भरले जाते. स्वस्थ मुख असेल, तर आरोग्य निरोगी राहते; पण स्वस्थ मुख नसेल, तर प्रकृतीच्या अनेक समस्या निर्माण होतात. हृदयविकार, श्वसनाचे आजार होण्याचा धोका असताे. त्यामुळे लहान वयातच दात व हिरड्यांची योग्य काळजी घेतल्यास निरोगी आयुष्य जगण्यास मदत होत असल्याचे जिल्हा मुख आरोग्य अधिकारी डॉ. नितीन पाटील यांनी सांगितले.

१०३ पाेलिसांची तपासणी जिल्हा मुख आरोग्य विभागातर्फे पोलिस मुख्यालयातील १०३ कर्मचारी व अधिकाऱ्यांची मुख तपासणी करण्यात आली. मुख कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात आली. तंबाखू, गुटखा यांच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचे मुख आरोग्य बिघडले आहे. गुटख्याच्या सेवनामुळे मुखाच्या कर्करोगाचा धोका असतो, त्यामुळे गुटखा खाणे टाळावे. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात आली.

शिरपूर, पिंपळनेर येथे आरोग्य शिबिर  मौखिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता यावी, यासाठी आरोग्य विभागाकडून शिबिर घेतले जात आहे. शिरपूर व साक्री तालुक्यातील दुर्गम भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करून मुख आरोग्याबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागाव्या, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

मुख आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम मुख आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेेरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते. चांगल्या मौखिक आरोग्यासाठी दोनवेळा ब्रश करणे आवश्यक आहे. दोन जेवणांच्या मध्ये गोड व चिकट पदार्थ खाणे टाळावे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळावे. 

 

टॅग्स :Dhuleधुळे