शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर वीज उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करा

By admin | Updated: January 10, 2017 23:57 IST

मालपूर येथे उपकेंद्रासाठी जागा मंजूर असतानाही उपकेंद्र कार्यान्वित केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहे.

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे विद्युत वितरण कंपनीचे वीज उपकेंद्र मंजूर असून ते त्वरित कार्यान्विय करून येथील शेतक:यांचा रब्बी हंगाम वाचवावा,  अशी मागणी येथील शेतक:यांनी केली आहे. उपकेंद्रासाठी जागा मंजूर असतानाही उपकेंद्र कार्यान्वित केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहे. तालुक्यातील मालपूर येथे 33-11 क्षमतेचे वीज उपकेंद्र गेल्या वर्षभरापासून मंजूर आहे. मात्र विद्युत वितरण कंपनीच्या कारभारामुळे ते अजून कार्यान्वित होताना दिसून येत नाही. याचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार असल्यामुळे शेतक:यांच्या चेह:यावर चिंता दिसून येत आहे.मालपूरसह परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड व पेरणी पूर्ण झाली असून या पिकांना आता पाणी देण्याची गरज येऊन ठेपली आहे. रब्बीतील पीक हे विहिरींच्या पाण्यावरच अवलंबून असतात, यासाठी अखंडित व पूर्ण दाबाने वीज आवश्यक आहे, मात्र येथे उपकेंद्र नसल्यामुळे दोंडाईचा येथून विजेचा पुरवठा केला जातो.दोंडाईचा येथून 20 कि.मी. दूर्पयत हा विजेचा पुरवठा होतो. ज्या विद्युत तारेतून पुरवठा होत असतो त्या खूप जुन्या व जीर्ण झाल्यामुळे तारा तुटून तांत्रिक बिघाड हा सतत होत असल्यामुळे मालपूर येथील मंजूर उपकेंद्र त्वरित कार्यान्वित होणे गरजेचे झाले आहे. झालेला तांत्रिक बिघाड शोधण्यासाठीदेखील खूप वेळ लागतो. यातच कधीकधी तर दिवस जातो. यामुळे शेती पिकांचेदेखील नुकसान होत आहे. तसेच 132 केव्ही दोंडाईचा येथून हा पुरवठा होतो. अंतर जास्त असल्यामुळे तसेच इतर गावांना देखील येथूनच वीजपुरवठा होत असतो. यामुळे विजेला पूर्ण दाब राहत नाही व शेतक:यांच्या यामुळे विद्युत मोटारीदेखील फिरत नसल्यामुळे हे उपकेंद्र त्वरित होणे आवश्यक आहे.आधीच खरिपात या परिसरातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे मोडून पडला आहे, आता संपूर्ण आशा रब्बीवर टिकून आहेत.