शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 13:29 IST

सर्दी-खोकल्याच्या रूग्णांच्या संख्येत वाढ : दवाखान्यांमध्ये वाढली गर्दी, आरोग्य विभागाने जनजागृती करावी

धुळे : गेल्या काही दिवसांपासून  वातावरण सातत्याने बदलत असून, कधी थंडी तर कधी कोरड्या वाºयामुळे सध्या विविध आजारांनी डोके  वर काढले आहे. व्हायरल फीवर आणि घरोघरी सर्दी, खोकला व तापाचे रूग्णांची संख्या वाढू  लागली आहे. त्यामुळे शासकीय रूग्णालयांसोबतच खाजगी दवाखान्यांमध्येही गर्दी होवू लागली आहे. अनेक नागरिकांची दिवाळी आजारपणातच साजरी झाली.गेल्या महिन्याभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान मुले, वृद्ध व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना साथीच्या आजाराची लागण लवकर होत असते. शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे प्रचंड गारठा निर्माण झालेला आहे. तर आता दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे दिवसा कडक उन्ह व रात्री थंडी अशा वातावरणामुळे साथीचे आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजारांमध्येही वाढ झालेली आहे. श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, खाजगी दवाखान्यांमध्ये रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सर्दी, खोकला, थंडीताप आदी रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरम्यान  आजार वाढल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आरोग्याप्रती जनजागृती करणे गरजेचे आहे. व्हायरल फीवरचाही अनेकांना त्रास होऊ लागला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे