शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

३९ लाखांचा अवैध दारूसाठा नष्ट

By admin | Updated: May 25, 2017 01:04 IST

न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही : स्थानिक गुन्हे शाखेने केला होता जप्त

धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून जप्त केलेल्या एकूण ३९ लाखांचा अवैध दारूसाठा नष्ट करण्यात आला़ याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र  दाखल केल्यानंतर प्रथम वर्ग न्यायाधीश पी़ एस़ भंडारी यांनी साठा नष्ट करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार मंगळवारी दुपारी नरडाणा पोलीस ठाणे आवारात दारूसाठा नष्ट करण्यात आला़ पोलीस अधीक्षक एम. रामकुमार व अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात मोहीम राबविली जात आहे़ तसेच जप्त केलेला दारूसाठा नष्ट करण्याची कार्यवाहीसुद्धा  सुरू करण्यात आली आहे़ त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून अवैध दारूसाठा जप्त केला होता़ त्याची एकूण किंमत ३९ लाख २९ हजार ५२० रुपये निष्पन्न करण्यात आली़जप्त केलेला मुद्देमाल तपासादरम्यान नरडाणा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता़ गुन्ह्याच्या तपासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले़. त्यानंतर प्रथम वर्ग न्यायाधीश पी़ एस़ भंडारी यांनी जप्त केलेला दारूसाठा नष्ट करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभाग व नरडाणा पोलीस ठाण्याला दिले होते़ उत्पादन शुल्क विभागाचे लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर दारूसाठा नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली़ तंबू उभारून कार्यवाहीदारूसाठा नष्ट करण्यासाठी उन्हाच्या तीव्रतेमुळे नरडाणा पोलीस ठाणे आवारात तात्पुरता तंबू उभारण्यात आला होता़ १० ते १५ कामगारांना बोलविण्यात आले होते़ तसेच एक खड्डा करण्यात आला होता़ बाटल्यांमधील दारू त्या खड्ड्यात ओतून नष्ट करण्यात आली़ या कामासाठी जवळपास संपूर्ण दिवस लागला़