धुळे : शासनाने मोबाइल टॉवर संदर्भात जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार शहरातील १0१ टॉवरपैकी केवळ १२ टॉवरचालकांनी मंजुरीसाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. शहरात बीएसएनएलसह विविध खासगी कंपन्यांचे सुमारे १0१ मोबाइल टॉवर आहेत. या कंपन्यांनी शहरातील इमारतींवर टॉवरची उभारणी केली आहे. त्यात शहरातील मनपाच्या देवपूर प्रभागांतर्गत ३४, अशोकनगर प्रभागांतर्गत २१, सुभाषनगर प्रभागांतर्गत १९ व शाळा क्रमांक ५ च्या प्रभागांतर्गत २७ अशा १0१ टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. हे टॉवर पाडण्याची कारवाई मनपातर्फे सुरू करण्यात आली होती. परंतु काही टॉवरचालक न्यायालयात गेल्याने कारवाई अपूर्ण राहिली होती. त्यात टॉवर संदर्भात मार्च २0१४ मध्ये नव्याने धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार टॉवरचालकांना परवानगी घेणे बंधनकारक आहे. आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या धोरणाची माहिती टॉवरचालकांना देण्यात आली होती. तरीही १0१ टॉवरपैकी केवळ १२ टॉवरचालकांनीच मनपाच्या नगररचना विभागाकडे नवीन धोरणानुसार प्रस्ताव दाखल केले आहेत. मनपाचे नुकसानमोबाइल कंपन्यांचे महिन्याला कोट्यवधी रुपयांचे ट्रान्झेक्शन होते. त्यात त्यांना एक ते दीड कोटीचा नफा होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातआहे. तसेच एखाद्या मोबाइल कंपनीला टॉवरउभे करायचे असेल, तर त्यांनी महापालिकेची अधिकृतपणे परवानगी घेणे आवश्यकआहे. महापालिकेने परवानगी दिल्यावर वीज वितरण कंपनीकडून त्यांना वीज जोडणी दिली जाते. परंतु अनेक कंपन्यांनी परस्पर टॉवर उभारले आहेत. त्यामुळे महापालिकेला त्यांच्यापासून कोणतेही उत्पन्न मिळत नाही.
----------------
शासनाने २४ मार्च २0१४ रोजी मोबाइल टॉवर उभारणीसंदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. यात परवानगी घेण्यासाठी विविध अटी व शर्तींचा समावेश करण्यात आलाआहे. ज्या परिसरात टॉवर उभारले आहे किंवा उभारायचे आहे, त्या परिसरातील ७0 टक्के नागरिकांचा नाहरकत दाखला जोडणे आवश्यक आहे. या अटीमुळेच टॉवरचालकांची मोठी अडचण झाली आहे. शहरातील सर्व मोबाइल टॉवरचालकांना नवीन धोरणानुसार परवानगी घेण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यातील केवळ १२ टॉवरचालकांचे प्रस्ताव दाखल झाले आहे. अन्य उर्वरित टॉवरचालकांना पुन्हा नोटिसा दिल्या जाणार आहेत. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. - सुभाष विसपुते, नगररचनाकार, महापालिका, धुळे