शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरांच्या  शोध मोहिमेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:37 IST

बालमजुरी निर्मूलन कार्यालयाकडूनच उदासीनता, साधी नोंद देखील नाही

सुनील साळुंखे । शिरपूर : बालपण हे जीवनात आनंदाचे क्षण देणारे असते़ कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहात नाही़ मात्र काही बालकांवर बालपणात कष्ट करून पोटाची खळगी भरण्याची वेळ येते़ शिरपूर शहरासह तालुक्यात बालमजुरी करणाºयांची संख्या देखील कमी नाही़ परंतु बालमजुरी निर्मुलन करणारे कार्यालय मात्र, सुस्त असल्याचे चित्र दिसते़ तालुक्यात किती बालमजुर आहेत, त्याची साधी नोंद देखील नाही़ बालमजुरांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने काही वर्षापूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे  शहरातून शेकडो बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात यश आले होते़ परंतु जिल्ह्यात हजारो बालमजुर आहेत़ कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतात काम करणारे बालमजुर, भीक मागणारे बालके तालुक्यासह जिल्ह्यात आहेत़ शासनाने सन २०१६ मध्ये बाल व किशोरवयीन प्रतिबंधक नियमन अधिनियम अंमलात आणला़ त्यामुळे त्याचवर्षी बालमजुरी निर्मुलन करणारे कार्यालयाने देखावा म्हणून कारवाई करून मुलांना मुख्य प्रवाहात आणले़ मात्र त्यानंतर अशा प्रकारची कारवाई या तालुक्यात झालेली नाही़ १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय आणि प्रकियांमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा असला तरी जिल्ह्यात हजारो बालके धोक्याच्या ठिकाणी काम करतांना दिसत आहेत़ आता १८ वर्षाखालील बालक बालमजूर म्हणून गणले जात आहे़ बालमजुरांच्या संदर्भात तक्रार आल्याशिवाय हे कार्यालय कामच करीत नाही़ मागील काही वर्षापासून एकही बालमजुराला पकडण्यात आलेले नाही़काय सांगतो कायदा ़़़़ १४ वर्षाआतील बालकास व्यवसाय व प्रकियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे़ १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रकियांमध्ये कामगार ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे़ फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने ते २ वर्षापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा किंवा किमान २० हजार व कमाल ५० हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होवू शकतात़ गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ ते ३ वर्षापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा आहे़ बालकास किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा़फक्त ४०० रूपये शिष्यवृत्ती ़़़़ बालमजूर दररोज १५० ते २०० रूपये कमवितात़ सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला ४०० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते़ त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी होत आहे़ बालमजुरीसाठी आई-वडीलही तेवढेच जबाबदार आहेत़ काही आई-वडीलांच्या व्यसनामुळे बालमजुरी फोफावत आहे़१४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय आणि प्रकियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे़ मात्र, या बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे तसे प्रयत्न दिसत नाही़१४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय आणि प्रकियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे़ मात्र, या बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे तसे प्रयत्न दिसत नाही़१४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय आणि प्रकियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे़ मात्र, या बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे तसे प्रयत्न दिसत नाही़

टॅग्स :Dhuleधुळे