शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ात मनपा शाळांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 15, 2017 12:26 IST

शहरात महापालिकेच्या 23 शाळा आहेत़ त्यापैकी 6 शाळा डिजीटल झाल्या असून 12 शाळा उर्दू तर 11 शाळा मराठी माध्यमाच्या आहेत़

ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 15 -  धुळे शहरात पावसाळयाच्या पाश्र्वभूमीवर शाळांची आवश्यक दुरूस्ती यंदाही करण्यात आलेली नाही़ त्यामुळे जीव धोक्यात घालून विद्याथ्र्याना शिक्षण घ्यावे लागणार आह़ेशहरात महापालिकेच्या 23 शाळा आहेत़ त्यापैकी 6 शाळा डिजीटल झाल्या असून 12 शाळा उर्दू तर 11 शाळा मराठी माध्यमाच्या आहेत़ त्यापैकी बहूतांश शाळांच्या इमारती या ब्रिटीशकालिन असल्याने त्यांच्या दुरूस्तीची अत्यंत आवश्यकता आह़े किमान तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती करून शैक्षणिक वातावरणाची निर्मिती होण्यासाठी करून द्यावी, असे पत्र मनपा शिक्षण मंडळाने गेल्या महिन्यात आयुक्तांना दिले होत़े मात्र तरीही शाळांच्या दुरूस्तीबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही़ मनपा शाळांमध्ये  प्रामुख्याने इमारतींची रंगरंगोटी, संपूर्ण छत दुरूस्ती, पाण्याची टाकी, दरवाजे, खिडक्या दुरूस्ती, वर्गखोल्यांवर फायबर पत्रे, स्वच्छतागृहे व शौचालये यांची दुरूस्ती, भिंतीला प्लास्टर, फळयाची निर्मिती, छताच्या पुढील बाजूची भिंत वाढविण, वर्गखोल्यांच्या फरशांची दुरूस्ती करणे, मनपा शाळा क्रमांक 14 च्या इमारतीचा स्लॅब गळत असल्याने भिंती ओल्या होत असून व्हरांडय़ात पावसाचे पाणी साचत असल्याने दुरूस्ती आवश्यक आह़े त्याचप्रमाणे इमारतीच्या उत्तर दिशेला संरक्षण भिंत व तारेचे कुंपण गरजेचे असून इमारतीच्या पुव्रेस गटारीला मुख्य गटारीस जोडून बंदीस्त करणे आवश्यक आह़े  जुन्या इमारतीची एका बाजूची भिंत पुर्णपणे पडली आह़े मनपा शाळा क्रमांक 20 मध्ये चार वर्गखोल्यांच्या छतास प्लास्टर आवश्यक असून कॉन्फरन्स रूमसाठी वर्गाची दुरूस्ती गरजेची आह़े त्याचप्रमाणे वॉचमन रूम, पावसाचे पाणी साचत असून ते वाहण्यासाठी जलवाहिनीची गरज आह़े  काही शाळांची अवस्था अत्यंत दयनीय असून याठिकाणी अपघात होण्याचीही शक्यता असत़े गेल्या वर्षी मनपा शाळा क्रमांक दहाची भिंत पडली होती़ त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले होत़े त्यानंतर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी यांना नोटीसाही बजाविण्यात आल्या होत्या़