शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शंका असल्यास आयोगाचे मार्गदर्शन घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:39 IST

महापालिका : मुख्य निवडणूक निरीक्षक सौरभ विजय यांच्या सूचना, परस्पर निर्णय नको

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपा निवडणूक प्रक्रियेत काही  शंका असल्यास राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घ्यावे, परस्पर कुठलाही निर्णय घेऊ नये, अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक सौरभ विजय यांनी दिल्या़ मनपा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा मुख्य निवडणूक निरीक्षक सौरभ विजय यांनी घेतला़ त्यावेळी ते बोलत होते़ बैठकीस, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, निवडणूक निरीक्षक गोरक्ष गाडिलकर व दिनेश जगदाळे उपस्थित होते़ बैठकीच्या प्रारंभी निवडणुकीबाबत आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पीपीटीद्वारे दिली. तसेच त्याबाबत विवेचन केले़ निवडणुकीची प्रक्रिया व कार्यवाही नि:पक्षपातीपणे पार पाडावी व मतदारांना अडचणी येणार नाही याची पुरेपुर दक्षता घ्यावी, मागील निवडणूक काळातील अनुभव लक्षात घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक सौरभ विजय यांनी या बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आचारसंहितेची कार्यवाही नि:पक्ष व प्रभावीपणे करावी, रात्रीच्या वेळी भरारी पथकांनी गस्त ठेवावी, प्रत्येक प्रसंगाचे चित्रिकरण करावे, कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाल्यास वरिष्ठांना संपर्क करावा, निवडणूक यंत्रणेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असे मार्गदर्शन केले़ बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कापडणीस, विक्रम बांदल, शरद पवार, संजय गायकवाड, गणेश मिसाळ, रामसिंग सुलाने, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्षप्रमुख राजेंद्र पाटील, हिशेब तपासणी पथक प्रमुख बी.डी. पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, उपायुक्त रविंद्र जाधव, शांताराम गोसावी, सहायक आयुक्त  नारायण सोनार व कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते़ बैठकीनंतर निरीक्षक सौरभ विजय यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची पाहणी केली़

टॅग्स :Dhuleधुळे