शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामे नियमित न केल्यास तिप्पट कर आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 11:45 IST

धुळे महापालिकेचा निर्णय, प्रशमन शुल्क भरून बांधकामे नियमित करण्यास १० मार्चपर्यंत मुदतवाढ

ठळक मुद्दे- ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची बांधकामे होणार नियमित - महापालिकेला आतापर्यंत केवळ ४५ प्रस्ताव प्राप्त - बांधकामाच्या रेडीरेकनर दराच्या निम्म्या दराने होणार आकारणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  महापालिकेने शासनाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते़ मात्र त्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याने मनपाने १० मार्चपर्यंत मुदत वाढविली आहे़ विहीत मुदतीत बांधकामे नियमित न केल्यास तिप्पट कर आकारणी केली जाणार आहे़ महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ क नुसार अनधिकृत बांधकामे प्रशासन आकार लावून प्रशमित संरचना नियमावली जाहीर केली आहे़  या नियमावलीनुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली बांधकामे नियमित करण्याबाबत मनपाने १५ फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मनपा हद्दीतील नागरिकांना केले होते़ बांधकामधारकांनी त्यांचे बांधकाम नियमित होण्यासाठी विहीत नमुन्यातील प्रस्ताव नगररचना कार्यालयात सादर करावा व बांधकाम शासनाने विहीत केलेले शुल्क भरून नियमित करून घ्यावे असे आवाहन केले होते़ परंतु १५ फेब्रुवारीपर्यंत केवळ ४५ प्रस्ताव मनपाला प्राप्त झाले़ त्यामुळे मनपाने या योजनेची मुदत १० मार्चपर्यंत वाढवली आहे़ या मुदतीनंतर अनधिकृत बांधकामे आढळल्यास नियमित मालमत्ता कर व कराच्या दोनपट मालमत्ता कर दरवर्षी वसुल केला जाईल, असे मनपाने जाहीर केले आहे़ महाराष्ट्र नगररचना (प्रशमित संरचना) नियम २०१७ मनपा  संकेतस्थळावर उपलब्ध आहे़बांधकामाच्या रेडीरेकनरचे दराच्या निम्म्या दराने प्रशमन शुल्काची आकारणी होणार आहे़ अनधिकृत बांधकाम जितक्या चौरस फुटाचे असेल त्यानुसार प्रति चौरस फुटाच्या हिशेबाने शुल्क आकारणी होईल़ सदर शुल्क भरल्यानंतर बांधकामे नियमित केली जाणार आहे़ शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही मनपाला केवळ ४५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत़