शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आरोप सारखे असतील तर भेदाभेद कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 18:20 IST

कामगार न्यायालय : संतोष मडावी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आरोपाचे स्वरुप व परिस्थिती सारखीच असेल तर शिक्षा देताना समानतेचे तत्व पाळणे आवश्यक आहे़ असा निर्वाळा देऊन एसटी महामंडळाचे शहादा डेपोतून बडतर्फ झालेले चालक संतोष लक्ष्मण मडावी यांना कामगार न्यायाधीश एम़ एम़ राव यांनी पूर्ववत मागील वेतन व सेवा अखंड धरुन नोकरीत पुन:स्थापित करण्याचा हुकूम देवून दिलासा दिला आहे़  संतोष मडावी हे शहादा एसटी डेपोत २०११ मध्ये चालक पदावर नोकरीवर असताना २१ मे २०१४ रोजी शहादा - खेतिया या मार्गावर महामंडळाची बस चालवून नेत असताना रायखेडच्या अलिकडे बसच्या पुढे एक मोटारसायकल स्वार डबलसीट जात होता़ त्याला रस्त्यावर पाण्याचा ड्रम पडलेला दिसला़ त्याने अचानक मोटारसायकल थांबविली़ त्यावेळी बसचालकाने अपघात होऊ नये म्हणून बस उजव्या बाजुने घेतली़ त्यात मोटारसायकलला निसटता धक्का लागल्याने मोटारसायकल स्वार रस्त्यावर पडले़ त्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली़ मात्र, त्याचवेळी समोरुन एक मोटारसायकलस्वार डबलसीट असल्याने बसवर जावून आदळला़ जबर जखमी होऊन रस्त्यावर पडले़ दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्यात त्यांचा मृत्यू ओढवला़ या अपघातास तक्रारदाराला जबाबदार धरुन त्याला नोकरीतून बडतर्फ करण्यात आले होते़ प्रकरण विवाद्य ठरल्याने कामगार न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले़ चौकशीचे कामकाज न्यायाधीश एम़ एम़ राव यांच्यासमोर चालले़ व्यवस्थापनाने अशाच स्वरुपाच्या प्राणांतिक अपघातात संजयकुमार श्यामराव पाटील, दत्तात्रय देसले, गणेश पाटील, चुनीलाल पाटील या सर्व चालकांना कमी शिक्षा देवून नोकरीत कायम ठेवल्याची बाब तक्रारदारतर्फे दस्तऐवजांच्या पुराव्याने सिध्द झाली़ तसेच मोटारसायकल स्वाराजवळ अधिकृत परवाना नसल्याचा पुरावा देण्यात आला़ दोन्ही बाजुंचे पुरावे, युक्तीवाद विचारात घेवून कोर्टाने मडावी यांची बडतर्फी अयोग्य व बेकायदेशीर ठरविली आहे़ तक्रारदारातर्फे अ‍ॅड़ पुंजाराम सानप यांनी कामकाज पाहीले़ 

टॅग्स :DhuleधुळेCourtन्यायालय