शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात आधारकार्ड नसल्यास लाभार्थ्यांना मिळणार नाही धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:13 IST

१ एप्रिलपासून कार्यवाही : ग्रामीण भागात ‘पॉस’ मशीनच्या अडचणी कायम

ठळक मुद्देजिल्ह्यातील ९८५ स्वस्त रेशन धान्य दुकानांमध्ये धान्य वितरण करताना अडचणी येऊ नये; म्हणून गेल्यावर्षी जिल्हा प्रशासनातर्फे पॉस मशीनचे वाटप केले होते. परंतु, सुरुवातीपासून या मशीमध्ये प्रचंड तांत्रिक अडचणी येत आहेत. पॉस मशीन वाटप झाल्यानंतर काही दुकानदारांलाभार्थ्यांना आॅपलाइन मोडमध्ये धान्य वितरण करण्यात आले. त्याची दखल घेता प्रशासनाने या मशीन्समध्ये मराठी सॉफ्टवेअर अपलोड करून दिले. परंतु, त्यानंतर रेंजची समस्या निर्माण झाली. ती आजतागायत आहे.साक्री व शिरपूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये पॉस मशीन्स कामच करत नसल्याचीही बाब समोर आली आहे. ही परिस्थिती विचारात घेता, जिल्हा प्रशासनातर्फे नुकतेच जिल्ह्यातील एकूण स्वस्त रेशन धान्य दुकानांपैकी निम्याहून अधिक दुकानदारांकडे असलेल्या पॉस मशीनमधील सीम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  जिल्ह्यातील स्वस्त रेशन धान्य दुकानांमध्ये १ एप्रिलपासून लाभार्थ्यांकडे आधारकार्ड नसेल तर त्यांना धान्य मिळणार नाही, अशी माहिती साहाय्यक पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ९८५ स्वस्त रेशन धान्य दुकानांना वाटप करण्यात आलेल्या पॉस मशीनला  ग्रामीण भागात प्रचंड अडचणी येत असल्याचे चित्र  जिल्ह्यात दिसून येत  आहे.धान्य मिळण्यासाठी आधारकार्ड लागणारच जिल्ह्यात एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या ३ लाख ८७ हजार इतकी आहे. परंतु, अनेक लाभार्थ्यांनी त्यांचे आधारकार्ड शिधापत्रिकेशी लिकिंग केलेले नाही. अशा परिस्थितीतही गेल्यावर्षापासून  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना धान्य वितरण सुरू होते. परंतु, आता शासन आदेशानुसार १ एप्रिलनंतर ज्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे आधारकार्ड लिकिंग केलेले नाही. किंवा त्यांच्याकडे आधारकार्ड नाही. अशा लाभर्थ्यांना धान्य दिले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे.   लाभार्थ्यांना शिधापत्रिकेची पोर्टेबिलिटी करता येणार शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार लाभार्थ्यांना कोणत्याही रेशन धान्य दुकानांमध्ये त्यांच्या शिधापत्रिका वापरता येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या शिधापत्रिकेची पोर्टेबिलिटी करावी लागणार आहे. १ एप्रिलनंतर या प्रक्रियेला जिल्ह्यात प्रारंभ होणार आहे, अशी माहिती साहाय्यक पुरवठा अधिकारी भामरे यांनी सांगितले आहे.