शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वेतन आयोग लागू न केल्यास संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 11:42 IST

 एस.टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांची माहिती

ठळक मुद्देराज्य परिवहन कर्मचाºयांचे वेतन इतर क्षेत्रातील महामंडळ व राज्य कर्मचाºयांपेक्षा कमी वेतन आयोग लागू होईपर्यंत हंगामी वाढ करावीमहागाई भत्ता लागू  न केल्याने, कामगार कराराचा भंग

 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : एस.टी. कर्मचाºयांना पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू न केल्यास, १७ आॅक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला जाईल, अशी माहिती महाराष्टÑ एस.टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार परिषदेला संघटनेचे प्रादेशिक सचिव स्वप्नील गडकरी,  धुळे विभागीय  सचिव संतोष वाडीले, जळगावचे विभागीय सचिव योगराज पाटील, पोपटराव चौधरी, होते.हनुमंत ताटे म्हणाले, राज्य परिवहन कर्मचाºयांचे वेतन इतर क्षेत्रातील महामंडळ व राज्य कर्मचाºयांपेक्षा कमी असल्याने, त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. त्यामुळे संघटनेने एस.टी.कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग मिळावा अशी मागणी केली आहे. मात्र प्रशासनाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिलेला आहे. राज्य शासकीय कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू झाला तरी तो राज्य परिवहन कर्मचाºयांना लागू केला जाणार नाही, असे प्रशासनाने संघटनेला कळविले आहे. दरम्यानच्या काळात एस.टी.कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू होईपर्यंत १ एप्रिल १६ पासून हंगामी वाढ करण्यात यावी.जानेवारी १७ पासून राज्य शासनाने लागू केलेला चार टक्के महागाई भत्ता रा.प. कर्मचाºयांना लागू न केल्यामुळे कामगार कराराचा भंग होत असल्याचे ते म्हणाले.खाजगी बसेसचा घाट रद्द करावादरम्यान महाराष्टÑ एस.टी. कामगार संघटनेचा प्रादेशिक मेळावा  सकाळी ११ वाजता सैनिक लॉन्स येथे प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. मेळाव्यात राज्य सरकारी कर्मचाºयांप्रमाणेच रा.प.कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी मिळावी, खाजगी बस घेण्याचा घाट रद्द करावा यासह विविध मागण्यांवर चर्चा झाली. तसेच १७ आॅक्टोबर पासून संपावर जाण्याचा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली.  संघटनेचे जनरल सेके्रेटरी हनुमंत ताटे यांनी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक पांडव, सुरेश चांगरे, एस.ए.ठाकरे, विलास पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.