शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मी बंड केले तर सर्वांना थंड करेल- आमदार अनिल गोटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 14:38 IST

भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात इशारा

ठळक मुद्दे-आचारसंहिता जाहीर होताच महापौर पदाचा उमेदवार जाहीर करणाऱ- आमच्या रक्तारक्तात भाजप असून आमचा झेंडा भाजपाचाच राहील- एकाही पक्षाची दादागिरी चालू देणार नाही

धुळे- मला बंड करायला भाग पाडू नका, मी बंड केले तर सर्वांना थंड करून टाकेल असा स्पष्ट इशारा आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या महानगर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला़ तसेच महापालिका निवडणूकीसाठी ज्या दिवशी आचारसंहिता लागेल, त्याच्या दुसºया दिवशी शिवतिर्थावर भव्य सभा होईल व त्यात महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, असे आमदार गोटे यांनी स्पष्ट केले़आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पांझरा चौपाटीवरील स्व़ उत्तमराव पाटील यांच्या स्मारकाशेजारी झाला़ या मेळाव्याला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल नेरकर, भिमसिंग राजपूत, तेजस गोटे, अ‍ॅड़ अमित दुसाणे, अमित खोपडे, शिरीश शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ मात्र भाजपचे महानगरप्रमुखांसह प्रमुख कार्यकर्त्यांची अनुपस्थिती होती़ मेळाव्याला इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद  मिळाला़ या मेळाव्यात बोलतांना आमदार गोटे म्हणाले की, मी लोकसंग्रामकडून निवडणूक लढेल, विकास आघाडी स्थापन करेल असे काहींना वाटत आहे़ पण माझ्या रक्तारक्तात भाजप भिनलेला असून आमचा झेंडा भाजपचाच राहील, असे गोटे यांनी स्पष्ट केले़ निवडणूक कशी लढवायची हे शिकविण्यासाठी बाहेरच्या शहाण्याची गरज नाही, असे ते म्हणाले़ महापालिकेत सत्ता आल्यास ५३२ किमी रस्त्यांची कामे, दररोज पाणी दिले जाईल असे आमदार गोटे म्हणाले़ एकाही पक्षाची दादागिरी चालू देणार नाही, असा इशाराही आमदार गोटे यांनी दिला़ आमच्याच पक्षाचा एक जण दिल्लीतून अधिकाºयांना रात्रभर फोन करून चौपाटी पाडण्यास सांगत होता, असे म्हणत आमदारांनी स्वपक्षाच्या नेत्यांनाही लक्ष्य केले़ शहरात एका बाबाला केवळ माती टाकायच्या पाट्या माहित असल्याचे आमदार गोटे म्हणाले़ माझ्याकडे इच्छुकांचे ३१७ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २६१ उमेदवार पदवीधर असल्याचेही गोटे यांनी स्पष्ट केले़  

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे