धुळे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोनिया सेठी (भा. प्र. से.) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने या पोट निवडणूकच्या उर्वरीत कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक म्हणून सोनिया सेठी यांची नेमणूक केलेली आहे. त्या गुलमोहोर शासकीय विश्राम गृह (संतोषी माता मंदिराजवळ, धुळे) येथे वास्तव्यास असून, त्यांचा संपर्क क्रमांक ९५४५९७९४२३ हा आहे. या निवडणुकीसंदर्भातील कामकाजासाठी अथवा उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधींना भेटीसाठी दुपारी १२ ते १ वाजेपावेतो जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे उपलब्ध राहतील. याची सर्व उमेदवार, सर्व मतदार तसेच जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी केले आहे.मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे.तत्कालीन सीईओआयएएस सोनिया सेठी या धुळे जिल्ह्यासाठी नविन नाहीत. त्या धुळे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर त्यांचे पती संजय सेठी देखील त्याच वेळी धुळ्याचे जिल्हाधिकारी होते. या अधिकारी दाम्पत्याच्या प्रशासकीय सेवेचा धुळे जिल्ह्याला लाभ झाला होता.
आयएएस सोनिया सेठी निवडणूक निरीक्षक जिल्हाधिकारी : भेटण्याची वेळ दुपारी १२ ते १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 21:57 IST