शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून

By admin | Updated: July 12, 2017 01:07 IST

पतीस अटक : धडगाव तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव तालुक्यात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पतीने खुनाची कबुली दिल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी देण्यात आली आहे़  खुंटामोडी बिलपाडा येथील रवींद्र कागडा वळवी याचे ८ जुलै रोजी पत्नी कोबीबाई हिच्यासोबत रात्री १० वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडण झाले होते़ प्रसंगी संतापाच्या भरात रवींद्र याने कोबीबाई हिचा गळा दाबून खून केला़ रात्री ११ वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत, त्याने हा प्रकार केला़ या खुनाची वाच्यता होऊ नये म्हणून त्याने तिच्या आत्महत्येचा बनाव रचून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला़  रवींद्र याने पत्नी कोबीबाई हिचा मृतदेह घरापासून २०० फूट अंतरावर शेतात ओढून नेत आंब्याच्या झाडाला ओढणी बांधून त्यावर लटकवला़ पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती त्याने ग्रामस्थांना दिल्यानंतर धडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी हजर झाले़  परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने रवींद्र वळवी याचा हा बनाव उघडकीस आणून त्यास ताब्यात घेतले होते़ याबाबत राजेंद्र डेमा पाडवी यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे़ओढत नेल्याने मृतदेहावर झाल्या जखमा घरापासून लांबवर असलेल्या शेतातील आंब्याच्या झाडापर्यंत नेण्यासाठी रवींद्र याने कोबीबाई हिचा मृतदेह केस ओढून फरपटत नेला. यात तिच्या चेहºयावर जखमा झाल्या, कानातील दागिना तुटून पडला़ त्यानंतर तिच्याच ओढणीने गळ्याला फास देत मृतदेह झाडाला टांगून दिला़ पोलिसांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर मृतदेहावरच्या जखमा आणि जमिनीवरील खुणा यामुळे हा प्रकार उघड झाला़ पती रवींद्र यास पोलिसांनी ताब्यात घेत त्याला धडगाव न्यायालयात हजर असता, सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली़ पोलीस निरीक्षक संजय भामरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नारायण चव्हाण हे तपास करीत आहेत़