शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

धुळे जिल्ह्यावर घोंगावतेय चक्रीवादळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 14:18 IST

जिल्हा प्रशासन : चार जूनला पहाटेपासून ते सकाळी दहापर्यंत असेल सक्रीय

धुळे : गुजरात राज्याच्या किनारपट्टीवरुन येणारे चक्रीवादळ एक ते चार जून दरम्यान धुळे जिल्ह्यातुन जाण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. सदर कालावधीत वा-याचा वेग खुप जास्त असुन मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़चार जून रोजी पहाटे चार वाजता साक्री म्हसदी वरून लामकानी ,चिमठाणे मार्गे सकाळी आठ वाजेच्या दरम्यान वर्शी, थाळनेर, लामकानी, चिमठाणे मार्गे त्याच दिवशी सकाळी नऊला शिंदखेडा, जैतपूर वरुन शिरपूर , सुळे मार्गे सकाळी १० वाजता खरगोण, मध्य प्रदेशकडे सरकणार आहे़आपले गाव वरील ठिकाणांपासून १५० ते २०० किमी च्या आत असल्यास आपल्याकडेही ०३ जुनच्या पहाटे पासून ६ जूनच्या सायंकाळपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे़निसर्ग चक्रीवादळ आणि अतीवृष्टीच्या दरम्यान नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आवश्यक सूचना जारी केल्या आहेत़ मच्छीमार व अन्य व्यक्तींनी नदीमध्ये जावु नये, मंगळवार ते गुरुवार या कालावधीत कोणीही आपले घर सुरक्षित असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये, आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तात्काळ सुरक्षीत स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवुन स्थलांतरीत व्हावे, घराच्या अवती भोवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विेजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे, आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे, आपले जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात, हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडीओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात, सोबत आवश्यक अन्नधान्य पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवा, आपला जिव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य दयावे, पिण्याचे पाणी शुध्दीकरण करुन वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे, सदयस्थितीत जिल्हयात विलगीकरणात असलेले नागरीक व चक्रीवादळाचे पार्श्वभुमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवतांना एकमेकांत मिसळणार नाहीत याची दक्षता घ्यावी, मदत आवश्यक असल्यास ग्रामपंचायत, तहसिलदार कार्यालय, जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02562- 288066 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे