नुकसानीनंतर पहावी
लागते मदतीची वाट
जिल्ह्यातील शेतकºयांना आजपर्यंतचा आलेला अनुभव फार वाईट आहे़ नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत मिळत नाही़ येणारी मदत फार उशिरा आणि टप्प्या टप्प्याने येते़ विशेष म्हणजे सरकारच्या निकषात केवळ हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदतीचा लाभ दिला जातो़ मुळात नुकसान यापेक्षा कितीतरी जास्त असते़ त्यामुळे मदतीनंतरही शेतकरी उभा राहु शकत नाही़
सरकार बदलले
परिस्थिती सारखीच
- सरकार बदलल्यानंतर धोरणात्मक निर्णयात बदल होईल, असा अनेकांचा अंदाज होता़ मुळात कुठलेही सरकार आल्यानंतर परिस्थिती सारखीच राहिली आहे़ यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आजपर्यंत संकटातून बाहेर पडू शकलेले नाही़ त्यासाठी ठोस मोबदल्याची आवश्यकता आहे़
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पाठविले प्रस्ताव
२०१७ :
- प्रस्ताव कोटीत : २ कोटी १३ लाख
मदत कोटीत : २० लाख
२०१८ :
- प्रस्ताव कोटीत : १९ कोटी ८१ लाख
मदत कोटीत : ००
२०१९ :
- प्रस्ताव कोटीत : ८४ लाख ५९ हजार
मदत कोटीत : ००
२०२० :
- प्रस्ताव कोटीत : २८ कोटी ५७ लाख
मदत कोटीत : २० कोटी ८८ लाख
२०२१ :
- प्रस्ताव कोटीत : २८ कोटी ४४ लाख
मदत कोटीत : ००
लोकप्रतिनिधी म्हणतात,
१) ००००
२) ००००